एस. टी. अभावी पंधरा गावांतील जनतेची पायपीट

By Admin | Updated: April 30, 2015 00:28 IST2015-04-29T21:57:05+5:302015-04-30T00:28:45+5:30

अर्धवट मोऱ्या, खराब रस्ते : गगनबावडा-राधानगरी एस. टी. बस बंद असल्याने गैरसोय

S. T. People in fifteen villages wanting to do so | एस. टी. अभावी पंधरा गावांतील जनतेची पायपीट

एस. टी. अभावी पंधरा गावांतील जनतेची पायपीट

गगनबावडा : राधानगरी एस.टी. पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. गगनबावडा-बावेली-राधानगरी दरम्यान रस्त्यावरील अर्धवट मोऱ्या, खराब रस्ता, धोकादायक वळणे, अशा विविध कारणांमुळे २००९ पासून ही गाडी बंद आहे. शिवाय बावेलीपर्यंत येणाऱ्या गाड्याही बंद आहेत. दोन तालुक्यांचा जवळचा मार्ग म्हणून येथील बावेली, कडवे, काटेवाडी, वाण्याचीवाडी, भटवाडी, गारीवडे, सुतारवाडी, बोरबेट, आदी गगनबावडा तालुक्यातील राही, चौके, मानबेट, कंदलगाव, मांडरवाडी, शेट्येवाडी, पडसाळी या गावांतील जनतेला एस. टी. अभावी पायपीट करावी लागत आहे.येथून दोन्ही तालुक्यांच्या ठिकाणी आयटीआय, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होते. म्हणून ही गाडी पूर्ववत सुरू करण्यासाठीचे एस. टी. विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. काटेवाडी ते इंडाल फाटा एक कि. मी. रस्ता वनखात्याच्या हद्दीत असल्याने हे काम रेंगाळले होते. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून या मुख्य रस्त्याचे काम रखडले होते. तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके यांनी वनखात्याकडे हा प्रस्ताव पाठविला होता. त्यामुळे गतवर्षी येथे खडीकरण व रुंदीकरण झाल्याने गाडीचा अडसर दूर झाला. परिवहन विभागाने संबंधित बांधकाम विभागाचे ‘ना हरकत’ मागितले होते. बावेली गावठाण येथे रुंदीकरण व खड्डे भरणे ही कामे श्रमदानातून केली. गाडी सुरू करण्यासाठी ठराव केले; पण अद्याप गाडी सुरू केली नाही. त्यामुळे पंधरा गावांतील प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी पूर्ववत सुरू करण्याची मागणी संबंधितांनी वरिष्ठांच्याकडे केली आहे. ाार्ताहर)


२०१४ च्या मे महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्या प्रिया वरेकर यांनी गगनबावडा-राधानगरी गाडी सुरू करण्याबाबत मागणी केली असता, सीईओ अविनाश सुभेदार यांनी पावसाळा संपताच ही गाडी सुरू करण्यास हिरवा कंदील दिला होता. परंतु, ते अजून आश्वासनच राहिले आहे.

Web Title: S. T. People in fifteen villages wanting to do so

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.