एस. टी. सुतार यांना पीएचडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:17 IST2021-07-22T04:17:00+5:302021-07-22T04:17:00+5:30
प्रा. सुतार यांना विद्यापीठातील गणित विभागातील डॉ. के. डी. कुचे यांचे मार्गदर्शन लाभले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष ...

एस. टी. सुतार यांना पीएचडी
प्रा. सुतार यांना विद्यापीठातील गणित विभागातील डॉ. के. डी. कुचे यांचे मार्गदर्शन लाभले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, गणित विभागप्रमुख प्रा. एस. पी. पाटणकर यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो (२१०७२०२१-कोल-एस टी सुतार (पीएचडी)
‘किशोरवयीन आहार’ विषयावर ऑनलाईन व्याख्यान
कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजमधील गृहविज्ञान विभागातर्फे किशोरवयीन आहार आणि कोविड १९ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यान झाले. त्यात कमला कॉलेजमधील कोल्हापूर गृहविज्ञान विभागप्रमुख प्रा. रेखा पंडित यांनी मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योग्य आणि संतुलित आहाराची आवश्यकता सांगितले. सध्याच्या स्थितीत रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या नैसर्गिक आहाराचे महत्त्व त्यांनी सांगितले. स्वस्थ खा आणि मस्त रहा, असा त्यांनी दिला. विवेकानंद कॉलेजच्या गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. ऊर्मिला खोत यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भारती मुढे यांनी आभार मानले. प्रा सई पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी प्रा. उज्ज्वला हिरकुडे, विद्यार्थिनी ऑनलाईन उपस्थित होत्या.