नेसरीच्या एस. एस. हायस्कूलने तयार केली ३३० शैक्षणिक साधने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:59+5:302021-05-31T04:18:59+5:30

नेसरी : काेरोना संसर्गामुळे सध्या शाळा बंद आहेत. मात्र, या काळात येथील एस. एस. हायस्कूल व छत्रपती शिवाजी कनिष्ठ ...

S. of Nesri. S. The high school developed 330 educational tools | नेसरीच्या एस. एस. हायस्कूलने तयार केली ३३० शैक्षणिक साधने

नेसरीच्या एस. एस. हायस्कूलने तयार केली ३३० शैक्षणिक साधने

नेसरी : काेरोना संसर्गामुळे सध्या शाळा बंद आहेत. मात्र, या काळात येथील एस. एस. हायस्कूल व छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी शैक्षणिक साधन निर्मिती उपक्रम राबवून इतरांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गणित, विज्ञान, भाषा, सामाजिक शास्त्रे आदी विषयांसाठी टिकाऊ स्वरूपाची सुमारे ८० वर्किंग नमुने, नकाशे, प्रसंग चित्रे, हस्तकला वस्तू व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी लवचिकता मापन साधन अशी सुमारे ३३० साधने शिक्षकांनी सुट्टीच्या कालावधीत बनवली आहेत. या सर्व साधनांचा वापर येत्या शैक्षणिक वर्षात वर्ग अध्यापन करताना होणार आहे. प्रशालेच्या शिक्षकांनी ३३० शैक्षणिक साधने बनवली आहेत. शिवाय त्या साधनांचे प्रदर्शन व मांडणीही केली आहे. या शाळेने कोरोनाकाळात परिसरातील सुमारे २५ गावांत जाऊन विद्यार्थ्यांना एकत्रित करून अध्यापन केले आहे. यासाठी त्यांना संस्थाध्यक्ष अ‍ॅड. हेमंत कोलेकर, संचालिका डॉ. अर्चना कोलेकर, प्राचार्य आप्पासाहेब मटकर यांचे मार्गदर्शन मिळाले.

कोट : कोरोनाकाळात ऑनलाईन शिक्षण हा पर्याय असला, तरी प्रत्यक्ष वर्ग अध्यापन ही काळाची गरज आहे. शैक्षणिक साधने तयार स्वरूपात मिळतात. मात्र, स्व:निर्मितीतून मिळणारा आनंद वेगळाच आहे. आमच्या सर्व शिक्षकांनी ही सर्जनशीलता जपलेली आहे. प्राचार्य आप्पासाहेब मटकर.

फोटो : ओळी : कोरोना काळातील वेळेचा सदुपयोग म्हणून एस. एस. हायस्कूल व छ. शिवाजी ज्युनियर कॉलेज शिक्षकांनी तयार केलेल्या शैक्षणिक साधनांची माहिती घेताना संस्थाध्यक्ष हेमंत कोलेकर व प्राचार्य आप्पासाहेब मटकर आदी.

क्रमांक : ३००५२०२१-गड-०३

Web Title: S. of Nesri. S. The high school developed 330 educational tools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.