रंकाळा येथे डे्रनेजमध्ये गुदमरून कामगाराचा मृत्यू

By Admin | Updated: December 21, 2014 00:51 IST2014-12-21T00:51:17+5:302014-12-21T00:51:39+5:30

रंकाळा परिसरातील संध्यामठ गल्लीतील वीस फूट ड्रेनेज

Ruthless worker dies at Ranenala | रंकाळा येथे डे्रनेजमध्ये गुदमरून कामगाराचा मृत्यू

रंकाळा येथे डे्रनेजमध्ये गुदमरून कामगाराचा मृत्यू

कोल्हापूर : रंकाळा परिसरातील संध्यामठ गल्लीतील वीस फूट ड्रेनेजमध्ये काम करीत असताना गुदमरून कामगाराचा आज, शनिवारी दुर्र्दैवी मृत्यू झाला. साबू शेखर भजंत्री (वय २५, रा. खुपिरे, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रंकाळा परिसरातील संध्यामठ गल्ली, बीएसएनएल कार्यालयासमोर वीस फूट खोल असलेल्या ड्रेनेजचे काम करण्यासाठी सहा कामगार सायंकाळी आले. ड्रेनेजच्या तोंडाचा आकार छोटा आहे. आतमध्ये असलेले पाणी त्यांनी मोटरपंपाच्या साहाय्याने बाहेर काढले. त्यानंतर साबू भजंत्रीसह त्याचा भाऊ मंजू, रमेश रूपसिंह राठोड, त्याचा भाऊ सुनील असे चौघेजण ड्रेनेजमध्ये उतरले. आतील भाग अत्यंत निमुळता असल्याने गॅस पसरलेला होता. काही अंतर वाकून ते आतमध्ये गेले असता चौघांनाही श्वासोच्छ्वास घेण्यास अडथळा होऊ लागला. जास्तच गुदमरल्याने रमेश, सुनील व मंजू यांनी आरडाओरड केली. यावेळी बाहेर उभ्या असलेल्या काशिनाथ लमाणी व सहकाऱ्याने कॉम्प्रेसरने पाईपद्वारे हवा ड्रेनेजमध्ये सोडली. काही प्रमाणात आॅक्सिजन मिळाल्याने तिघेजण बाहेर आले; परंतु साबू हा मागे राहिला असल्याचे लक्षात येताच ते पुन्हा माघारी फिरले असता तो बेशुद्ध होऊन पडलेला दिसला. त्यांनी ओढत त्याला ड्रेनेजमधून बाहेर काढले. या घटनेची माहिती महापालिका अग्निशामक दलास मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेत जखमी साबू भजंत्री याला ‘सीपीआर’मध्ये आणले. याठिकाणी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळी महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
कामगारांचा आक्रोश
साबू भजंत्री याचा सख्खा भाऊ मंजू हा घटनास्थळी होता. भावाचा मृतदेह पाहून त्याला मानसिक धक्का बसला. या घटनेची माहिती खुपिरे गावी समजताच त्याने आई-वडील, नातेवाइकांनी ‘सीपीआर’मध्ये गर्दी केली. यावेळी त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

Web Title: Ruthless worker dies at Ranenala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.