ग्रामीण युवकांनी लघुउद्योगातून करिअर घडवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:16 IST2021-07-12T04:16:23+5:302021-07-12T04:16:23+5:30
बीड शेड (ता. करवीर) येथील ज्योतिर्लिंग बेकरीच्या सहा वर्धापनदिनानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर, मास्क व फळझाडांच्या आयोजित मोफत वितरण ...

ग्रामीण युवकांनी लघुउद्योगातून करिअर घडवावे
बीड शेड (ता. करवीर) येथील ज्योतिर्लिंग बेकरीच्या सहा वर्धापनदिनानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर, मास्क व फळझाडांच्या आयोजित मोफत वितरण कार्यक्रमात गावडे बोलत होते. अध्यक्षस्थानी कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संचालक उत्तमराव वरुटे होते
यावेळी बोलताना जिल्हा मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेस नेते शामराव सूर्यवंशी म्हणाले, ग्रामीण जनतेच्या सोयीच्या दृष्टिकोनातून उद्योगधंद्यांना चालना देण्याचे काम सुशिक्षित पिढीने करावे
यावेळी कुंभी-कासारीचे संचालक उत्तमराव वरुटे, सरपंच सर्जेराव तिबिले, पांडुरंग विकास संस्थेचे अध्यक्ष अमित वरुटे, दिनकर सुर्यवंशी, मुकुंद पाटील, प्रताप पाटील, प्रकाश तिबिले, आदींची भाषणे झाली. प्रारंभी कृष्णात गावडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात आले. विविध मान्यवरांच्या हस्ते ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझर व फळझाडांचे वितरण करण्यात आले. शेवटी विजय गावडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास बबन गावडे, सचिन पानारी, राजाराम गावडे, निवृत्ती गावडे, आकाराम गावडे, सुभाष पाटील, दिनकर गावडे, विनायक मस्कर, पांडुरंग कदम, कुंदन कांबळे, शिवाजी गावडे, राहुल गावडे, सागर गाताडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थितीत होते.