‘भाजप’च्या शहरासह ग्रामीण अध्यक्षांच्या निवडी
By Admin | Updated: January 13, 2016 01:09 IST2016-01-13T00:43:34+5:302016-01-13T01:09:46+5:30
संघटनात्मक नेमणूक : शहरातील सात, तर ग्रामीणच्या चौदा विभागांचा समावेश

‘भाजप’च्या शहरासह ग्रामीण अध्यक्षांच्या निवडी
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षामध्ये संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी शहरातील सात तर चौदा ग्रामीण मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्या. निवडीचे पत्र महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते देण्यात आली.
पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून चार दिवसांपूर्वी शहरातील ८१ प्रभागातील प्रभाग अध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या होत्या. त्यानंतर मंडल अध्यक्षांच्या निवडी केल्या. जिल्हा निवडणूक अधिकारी कांताताई नलवडे यांच्या मान्यतेने पक्षाच्या जिल्हा कार्यालयात महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी सात प्रमुख मंडल अध्यक्ष व सरचिटणीस यांच्या निवडीची घोषणा केली. मंडल निरीक्षक म्हणून अशोक कोळवणकर, अशोक देसाई, सयाजी आळवेकर, हेमंत आराध्ये, मधुमती पावनगडकर, गणेश देसाई, हर्षद कुंभोजकर यांनी काम पाहिले.
यावेळी सरचिटणीस अशोक देसाई, सदानंद कोरगावकर, संतोष भिवटे, संदीप देसाई, गणेश देसाई, अमोल पालोजी, आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, प्रभा टिपुगडे, हेमंत आराध्ये, आदी उपस्थित होते.
निवड झालेले पदाधिकारी असे, (मंडल , अध्यक्ष, सरचिटणीस या क्रमाने ) मंगळवार पेठ : संतोष माळी, गणेश चिले. शिवाजी पेठ : प्रदीप पंडे, ओंकार जोशी. लक्ष्मीपुरी : विवेक कुलकर्णी. शाहूपुरी : आशिष कपडेकर, ऋषिकेश मुदगल. उत्तरेश्वर पेठ : सतीश पाटील, विरेंद्र मठपती. राजारामपुरी : संग्रामसिंह निंबाळकर, गणेश पसारे. कसबा बावडा : डॉ. सदानंद राजवर्धन, सतीश कांबळे .
दरम्यान, जिल्ह्णातील चौदा ग्रामीण मंडल अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पक्षाने पूर्ण केली. ही निवडणूक प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी वासुदेव काळे, साहाय्यक निवडणूक अधिकारी शिवाजी बुवा यांच्या मार्गदर्शनखाली पार पडली.
यात निवड झालेले मंडल अध्यक्ष असे : धैर्यशील देसाई (शिरोळ), पी. डी. पाटील (हातकणंगले), सुरेश बेनाडे (पन्हाळा), दीपक शिरगावकर (राधानगरी), परशुराम तावरे (कागल), वसंत जिवबा पाटील (करवीर), नामदेव विष्णू पाटील (चंदगड), नाथाजी पाटील (भुदरगड), हेमंत कालेकर (गडहिंग्लज), मिलींद भिडे (जयसिंगपूर), अरुण देसाई (आजरा), शहाजी भोसले (इचलकरंजी), संदीप पाटील (गगनबावडा), दाजी बंडू चौगले (शाहूवाडी).
या प्रक्रियेसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, संघटन महामंत्री बाबा देसाई यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती शंतनू मोहिते यांनी पत्रकाद्वारे दिली. (प्रतिनिधी)