ग्रामविकास मंत्रीच गेले त्या शेतकऱ्याच्या भेटीला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:31+5:302021-07-04T04:17:31+5:30
या नदीवर ६० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला बंधारा अत्यंत कमी उंचीचा व अरुंद आहे. त्यामुळे थोड्या पावसानेही तो पाण्याखाली जातो. ...

ग्रामविकास मंत्रीच गेले त्या शेतकऱ्याच्या भेटीला !
या नदीवर ६० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला बंधारा अत्यंत कमी उंचीचा व अरुंद आहे. त्यामुळे थोड्या पावसानेही तो पाण्याखाली जातो. त्यामुळे २०१७मध्ये येथे सुमारे १० कोटी रुपये खर्चाच्या पुलाला मंजुरी मिळाली. परंतु, भूसंपादनाचा प्रश्न मार्गी न लावताच या पुलाचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे येथील शेतकरी सुरेश चौगले यांची जमीन बागायती असतानाही त्यांना जिरायतीप्रमाणे दर निश्चित केला. त्यामुळे या शेतकऱ्याने हे काम थांबविले होते. त्या कामाला आता गती मिळणार आहे.
त्यामुळे मुश्रीफ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तसेच चौगले कुटुंबीयांना भेटून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपसरपंच उमेश पाटील, सुभाष चौगले, सोनगेचे माजी सरपंच नारायण ढोले, रमेश पाटील (म्हाकवे), किरण पाटील, सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, डी. व्ही. शिंदे यांसह परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ०३बस्तवडे मुश्रीफ
कॅप्शन : बस्तवडे पुलामध्ये जमीन संपादित झालेल्या परंत त्याला तांत्रिक अडचणीमुळे कमी भरपाई मिळत असणाऱ्या चौगले कुटुंबीयांची मंत्री मुश्रीफ यांनी भेट घेतली.
छाया - संदीप तारळे, गलगले