शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत महामॅरेथॉन’; धावा आणि जिंका एकूण सहा लाखांची बक्षिसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 19:10 IST

आरोग्याच्या दृष्टीने तंदुरुस्त राहण्याचा संदेश देणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या यंदाच्या तिसºया पर्वातील सहभागासाठी नावनोंदणी करण्याकरिता आता मोजके दिवस उरले आहेत. नावनोंदणीची अंतिम मुदत शनिवार (दि. २१) पर्यंत आहे. लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी धावपटू, नागरिकांनी त्वरित नावनोंदणी करावी.

ठळक मुद्दे‘लोकमत महामॅरेथॉन’च्या नावनोंदणीसाठी उरले मोजके दिवसग्रुप रजिस्ट्रेशन करण्याची संधी

कोल्हापूर : आरोग्याच्या दृष्टीने तंदुरुस्त राहण्याचा संदेश देणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या यंदाच्या तिसºया पर्वातील सहभागासाठी नावनोंदणी करण्याकरिता आता मोजके दिवस उरले आहेत. नावनोंदणीची अंतिम मुदत शनिवार (दि. २१) पर्यंत आहे. लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी धावपटू, नागरिकांनी त्वरित नावनोंदणी करावी.येथील पोलीस क्रीडांगणातून ५ जानेवारी २०२० रोजी पहाटे पाच वाजता ‘लोकमत मॅरेथॉन’ची सुरुवात होणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये १२ वर्षांपेक्षा जास्त आणि धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी ‘फन रन’, १६ वर्षांपेक्षा जास्त वर्षांवरील व्यक्तींसाठी १० किलोमीटरची ‘पॉवर रन’ होणार आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी २१ किलोमीटरचा गट आणि तीन किलोमीटरची ‘फॅमिली रन’ आणि पाच किलोमीटर अंतराचा स्वतंत्र गट आहे.

सर्व वयोगटांतील व्यक्तींना त्यामध्ये सहभागी होता येईल. सैन्य आणि पोलीस दलातील धावपटूंसाठी २१ किलोमीटरचा ‘डिफेन्स’ हा वेगळा गट आहे. विविध पाच गटांमध्ये होणाºया मॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. त्यासह धावपटूंना आकर्षक मेडलही मिळणार आहे. वैयक्तिक आणि ग्रुपच्या स्वरूपात धावपटू, नागरिकांना या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होता येईल. सहभागी होणाºयांना ग्रुप रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध आहे. कोल्हापूरमधील या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-३’साठी लवकरात लवकर नोंदणी करा.अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधाया महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटवर आॅनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल किंवा लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९६३७३३०७०० अथवा ९७६७२६४८८५ वर संपर्क साधावा. या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-२’ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र मॅरेथॉनमय होणार आहे. 

प्रकार (अर्ली बर्ड शुल्क) असे मिळणार साहित्य

  • ३ किलोमीटर (फॅमिली रन) ४०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • ५ किलोमीटर (फन रन) ५०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • १० किलोमीटर (पॉवर रन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (डिफेन्स गट) १००० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट

 

मी कधीही मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला नव्हता. मात्र, सन २०१७ च्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये मी प्रथम सहभागी झालो. या मॅरेथॉनमुळे मी खूप प्रभावित झालो. माझ्या रोजच्या व्यायामासोबत मी धावण्याचा सराव वाढविला. त्यानंतर मी बºयाच मॅरेथॉनमध्ये धावलो. त्यामुळे माझे आरोग्य खूप चांगले झाले असून, माझ्या तणावाच्या कामातही मी ब्लड प्रेशर, शुगरमुक्तआहे. माझ्यामुळे माझे सहकारीदेखील आता मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात. आरोग्याचा खूप चांगला मंत्र मला या महामॅरेथॉनमुळे मिळाला, याबद्दल ‘लोकमत’चे मन:पूर्वक आभार मानतो.- औदुंबर पाटील,वरिष्ठ पोलीस निरीक्षक

सध्याच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी धावणे अथवा चालणे आवश्यक बनले आहे. सध्या सर्वत्र मॅरेथॉनची क्रेझ आहे. ‘लोकमत’ने ही महामॅरेथॉनची संधी कोल्हापूरमध्ये उपलब्ध करून दिली आहे. तिचा मला आनंद आहे. त्यामध्ये मी यावर्षीदेखील सहभागी होणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये आपण सहभागी होऊन धावण्याचा आनंद घेऊ शकता आणि तंदुरुस्त राहू शकता.- चेतन चव्हाण,आयर्नमॅन फिनिशर

 

 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनLokmatलोकमतkolhapurकोल्हापूर