वाघजाई डोंगरावर युवकांच्या खुनाची अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:24 IST2021-05-11T04:24:34+5:302021-05-11T04:24:34+5:30
याच दरम्यान सायंकाळी सातार्डे (ता. पन्हाळा) येथील वाघजाई डोंगरावर एका अज्ञात युवकाचा मृतदेह पडला असून या युवकाचा खून ...

वाघजाई डोंगरावर युवकांच्या खुनाची अफवा
याच दरम्यान सायंकाळी सातार्डे (ता. पन्हाळा) येथील वाघजाई डोंगरावर एका अज्ञात युवकाचा मृतदेह पडला असून या युवकाचा खून झाल्याची अफवा या परिसरातील पंचक्रोशीत रविवारी रात्री ९ वाजता वाऱ्यासारखी पसरली. साहजिकच बातमीची खातरजमा करण्यासाठी पंचक्रोशीत अनेकांचे फोन आपापसात खणखणू लागले. याची खबर सातार्डेचे पोलीस पाटील अनिता पाटील यांचे पती अशोक पाटील यांना लागली. त्यांनी तात्काळ ग्रामस्थांच्या सहकार्याने रात्रीच या परिसराची प्रत्यक्षात पाहणी केली; पण असा प्रकार घडला नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने वाघजाई डोंगरावर युवकाचा खून झालेल्या अफवेला पूर्ण विराम मिळाला.
सातार्डे गावाला लागूनच वाघजाई देवीच्या नावाने विस्तीर्ण असा डोंगर आहे. या ठिकाणी मानवी वस्ती नसल्याने हा परिसर निर्जन असून डोंगरकपारी व झाडाझुडपांनी व्यापलेला आहे. त्यामुळे अनेकदा या निसर्गरम्य डोंगरावर तरुण मंडळी रस्सा पार्टीसाठी येत असतात. अशा निर्जन स्थळी अज्ञात युवकाचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत पडला असून कोणी तरी खून करून मृतदेह येथे फेकून दिला आहे. अशी दबक्या आवाजातील चर्चा वाघजाई परिसरातील गावांत सुरू होती. मात्र, अशोक पाटील यांनी वाघजाई देवी मंदिर व विहिरी परिसर पालथा घालून शहानिशा केली आणि युवकाचा खून झाला नसल्याच्या प्रकरणावर पडदा पडला.