निपाणीत वाघ आल्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:23 IST2021-08-01T04:23:35+5:302021-08-01T04:23:35+5:30

निपाणी : शहराच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळ असलेल्या एका खासगी बागेत वाघ आल्याचा व्हिडिओ शुक्रवारी (दि. ३०) रात्री सोशल मीडियावर व्हायरल ...

Rumors of a tiger in Nipani | निपाणीत वाघ आल्याची अफवा

निपाणीत वाघ आल्याची अफवा

निपाणी : शहराच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळ असलेल्या एका खासगी बागेत वाघ आल्याचा व्हिडिओ शुक्रवारी (दि. ३०) रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये दिसणारा परिसर आणि निपाणीच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवळ असलेल्या परिसर एकसारखा दिसत असल्याने निपाणीत खरोखरच वाघ आल्याचे नागरिकांना वाटत होते. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते; पण हा व्हिडिओ खोटा असून ही केवळ अफवा आहे, असे पोलीस प्रशासन व वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षिण प्रवेशद्वार हे नागरिकांचे वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. या परिसरात अनेक नागरिक सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी जात असतात. पण या परिसरात वाघ आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांनी याची खातरजमा न करताच तो इतरांनाही फॉरवर्ड केला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. शनिवारी दिवसभर सोशल मीडियात याच विषयाची चर्चा होती; पण हा व्हिडिओ खोटा असल्याचे वनाधिकाऱ्यांंनी सांगितले आहे.

Web Title: Rumors of a tiger in Nipani