खुमासदार ‘हास्यकल्लोळ’मध्ये रसिक दंग

By Admin | Updated: December 12, 2014 00:34 IST2014-12-12T00:18:27+5:302014-12-12T00:34:27+5:30

‘लोकमत’ दीपोत्सव बंपर ड्रॉ : दीपक देशपांडे यांच्या ‘एकपात्री’ला टाळ्यांच्या कडकडाटाने दाद

Rumorious riot in 'Khusamdar' Hashikalol | खुमासदार ‘हास्यकल्लोळ’मध्ये रसिक दंग

खुमासदार ‘हास्यकल्लोळ’मध्ये रसिक दंग

कोल्हापूर : परदेशात लॉस एंजिल्सपासून अंदमान-निकोबार या खेडेगावांमध्ये ‘हास्यकल्लोळ’चे कार्यक्रम केले; पण महाराष्ट्रासारखा आनंद तेथे मिळाला नाही, अशा खुमासदार विनोदी शैलीत किस्से सादर करून आज, बुधवारी हास्यसम्राट
प्रा. दीपक देशपांडे यांनी रसिकांना पोट धरून हसायला लावले. त्यांच्या नर्मविनोदाला टाळ्या आणि हास्याच्या फवाऱ्यांनी रसिकांनी भरभरून दाद दिली. निमित्त होतं... ‘लोकमत’च्या दीपोत्सव बंपर ड्रॉ कार्यक्रमाचे.
कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात बंपर ड्रॉ कार्यक्रमांतर्गत
प्रा. देशपांडे यांच्या ‘हास्यकल्लोळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
देशपांडे यांनी, ‘लोकमत’तर्फे असे अनेक कार्यक्रम राज्यभर घेतले जातात. त्या माध्यमातून आमच्यासारख्या कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध होेते, असे सांगून संपूर्ण भारतभर ‘लोकमत’चा दबदबा असल्याचे नमूद केले.
त्यांनी आपल्या खुमासदार शैलीतून विनोदी किस्से सादर केले. यात त्यांनी डॉक्टरकडे गेलेल्या पेशंटची दटावणीच्या सुरात होत असलेली विचारपूस, ग्रामीण भागातील गुुरुजी हातात तंबाखू मळत आपल्या खणखणीत आवाजात चौफेरपणे सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्यांना देत असलेले धडे, महाराष्ट्रातील एस. टी. स्टॅँडवरील सरावलेला कंट्रोलरचा आवाज, न्यूयॉर्कच्या विमानतळावरील आवाजापेक्षा खणखणीत वाटतो, वीटभट्टीसह टॉवेल कारखान्यातील कामगारांची आकाशवाणीच्या निवेदकाकडून घेतली जात असलेली मुलाखत, सोलापुरातील भावाने आपल्या बहिणीला कॉईन बॉक्सवरून फोन करून आळवलेला ‘बोल ताई’ हा सूर, यातून घडणारे गमतीदार किस्से सादर केल्यावर रसिकांनी अक्षरश: टाळ्यांचा पाऊस पडला; तर मराठी-हिंदी सिनेमातील कलाकारांच्या नकलांबरोबर राजकीय नेते शरद पवार, आर. आर. पाटील, विलासराव देशमुख अशा दिग्गज नेत्यांचा हुबेहूब आवाज काढून उपस्थितांना हास्याचे फवारे उडवायला भाग पाडले. हास्याच्या प्रचंड धबधब्यामुळे संपूर्ण सभागृह हास्यमय झाले.
या कार्यक्रमाला ‘लोकमत’ परिवारासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)

उपस्थितांनाही मिळाली आकर्षक बक्षिसे
‘लोकमत’ दीपोत्सव बंपर लकी ड्रॉचा दिमाखदार कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या रसिकांमधूनही लकी ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये गौरी कुलकर्णी, श्रावणी चौगुले, पूजा हंडे, नीता देशपांडे यांना आकर्षक बक्षिसे मिळाली. त्यांना हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे व ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘लोकमत’च्या दीपोत्सव बंपर ड्रॉ कार्यक्रमांतर्गत ‘हास्यकल्लोळ’ कार्यक्रम सादर करताना प्रा. दीपक देशपांडे. यावेळी उपस्थित रसिक.

Web Title: Rumorious riot in 'Khusamdar' Hashikalol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.