सत्ताधारी गटाने पराभवाच्या भीतीने सभा गुंडाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST2020-12-09T04:19:40+5:302020-12-09T04:19:40+5:30
या संघाच्या प्रवेशद्वारामध्ये विरोधी गटाने समांतर सभा घेतली. कार्यकारिणी निवडीसाठी गुप्त मतदान प्रक्रियेसाठी न्यायप्रविष्ट अर्ज असताना त्याबाबतचा विषय हा ...

सत्ताधारी गटाने पराभवाच्या भीतीने सभा गुंडाळली
या संघाच्या प्रवेशद्वारामध्ये विरोधी गटाने समांतर सभा घेतली. कार्यकारिणी निवडीसाठी गुप्त मतदान प्रक्रियेसाठी न्यायप्रविष्ट अर्ज असताना त्याबाबतचा विषय हा सभेत घाईगडबडीने घेऊन चुकीच्या पद्धतीने या निवडी केल्याने आम्ही त्याला तीव्र विरोध केला असल्याचे व्ही. जी. पोवार यांनी सांगितले. सभागृहात आमचे बहुमत पाहून सत्ताधाऱ्यांनी सभा गुंडाळली. सत्ताधाऱ्यांनीच गुप्त मतदान पद्धतीची मागणी करून यापूर्वीही निवडणूक लावली होती, असे रंगराव तोरस्कर यांनी सांगितले. यावेळी के. के. पाटील, दत्ता जाधव, डी. एस. घुगरे, आर. वाय. पाटील, अर्जुन होनगेकर, ए. आर. पाटील, एन. बी. पाटील, शीतल शिरहट्टी, एस. के. पाटील, जयसिंग पवार, पी. डी. शिंदे, आदी उपस्थित होते.
चौकट
सत्ताधाऱ्यांना विचारलेले प्रश्न
संघाची प्रिंटिंग प्रेस डिजिटल असताना छपाईची कामे बाहेर का दिली जातात, गेल्या वर्षभरात सभागृह, दुकानगाळे भाडेतत्त्वावर का दिली नाहीत, प्रवासभत्ता घेतला जात नसल्याच्या अभिनंदनाचा ठराव असतानाही प्रत्यक्षात चेकद्वारे प्रवास खर्च कसा काढला, सन २०१७-१८ मधील २२ लाखांचे स्टेशनरी साहित्य शिल्लक होते. गेल्यावर्षीही २९ लाखांचे साहित्य शिल्लक का राहिले, आदी प्रश्न सताधाऱ्यांना लेखी विचारले होते, असे आर. वाय. पाटील यांनी सांगितले.
फोटो (०८१२२०२०-कोल-मुख्याध्यापक संघ समांतर सभा ०१ व ०२) : कोल्हापुरात मंगळवारी मुख्याध्यापक संघाच्या प्रवेशद्वारातील समांतर सभेत विरोधी गटातील शीतल शिरहट्टी यांनी कार्यकारिणी निवडीबाबत अध्यक्षांना लिहिलेले पत्र वाचून दाखविले. (छाया : नसीर अत्तार)