शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- सभासदांची एकी; ‘बिद्री’त पुन्हा ‘के. पी.’च

By विश्वास पाटील | Updated: December 5, 2023 12:36 IST

एकतर्फी विजयाने आबीटकर, मंडलिक, ‘ए. वाय’ना धोबीपछाड : सर्व उमेदवार ५६३० च्या मताधिक्यांनी विजयी

दत्ता लोकरेसरवडे : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील व कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील आदींच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने सर्वच्या सर्व २५ जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळवत सत्ता कायम राखली. विरोधी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबीटकर, भाजपचे समरजीत घाटगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना धोबीपछाड देत ‘बिद्री’त पुन्हा ‘के. पी.’च ‘लै भारी’ हे सभासदांनी दाखवून दिले. गेल्यावर्षी तीन हजारांचे मताधिक्य होते, त्यापेक्षाही अधिक ५६३० इतके प्रचंड मताधिक्य घेत सर्व २५ उमेदवार विजयी झाले.‘बिद्री’कारखान्याच्या सत्तेसाठी गेली महिनाभर सत्तारुढ व विरोधकांनी निकराचे प्रयत्न केले. ‘साम, दाम, दंड’ सगळ्या नीतीचा वापर सर्रास झाला. या निवडणुकीत ए. वाय. पाटील यांनी सत्तारुढ तर माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी विरोधकांची साथ सोडल्याने ‘राधानगरी व भुदरगड तालुक्यातील समीकरणे बदलली होती. सत्ता कायम राखण्यासाठी तर विरोधकांनी परिवर्तनासाठी कंबर कसली होती.

करवीर, राधानगरी, भुदरगड व कागल तालुक्यांतील २१८ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या ‘बिद्री’च्या २५ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी रविवारी ५६ हजार ९१ सभासदांपैकी ४९ हजार ९४० (८९ टक्के) मतदान झाले होते.मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून शाहू मार्केट यार्ड येथील मुस्कान लॉन येथे १२० टेबलांवर मतमोजणी करण्यात आली. यामध्ये, सत्तारुढ महालक्ष्मी विकास आघाडीने पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. हे मताधिक्य शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिले. सरासरी साडेतीन हजाराच्या फरकाने सर्व २५ जागांवर दणदणीत विजयी मिळवत कारखान्याच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यात माजी आमदार के. पी. पाटील हे यशस्वी झाले. विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

सत्यजित जाधव सर्वाधिक मतांनी विजयी

विजयी पॅनेलमध्ये २९१०१ इतकी मते घेऊन पहिल्या क्रमांकाने सत्यजित जाधव विजयी झाले. त्यांच्या पाठोपाठ के. पी. पाटील यांनी २८६९३, प्रवीणसिंह पाटील यांनी २८५५२ तर रावसोा खिलारी यांनी २८३०८ मते घेतली.मुश्रीफांचे भाकीत...‘ ए. वाय.’ यांची डिपॉझीट

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘बिद्री’च्या निवडणुकीत ए. वाय. पाटील यांची डिपॉझीट जप्त होणार, असे भाकीत वर्तविले होते. ‘ए. वाय.’ यांचा तब्बल ५१२३ मतांनी पराभव झाला.दाजी पराभूत, मेहुणा विजयी !

अध्यक्ष के. पी. पाटील हे विजयी झाले तर त्यांचे दाजी व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे पराभूत झाले शिवाय सरवडेच्या राजेंद्र पाटील यांनी त्यांचे मामा विठ्ठलराव खोराटे यांचा पराभव केला. मुरगूडचे प्रवीणसिंह यांनी लहान बंधू रणजितसिंह यांचा पराभव केला. अध्यक्ष के. पी. पाटील यांचे भाचे सुनील सूर्यवंशी आणि व्याही गणपतराव फराकटे हे विजयी झाले, तर माजी संचालक के. जी. नांदेकर आणि जयवंत पाटील हे सासरे व जावई दोघेही पराभूत झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकK P. Patilके. पी. पाटीलPrakash abitkarप्रकाश आबिटकर