शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
4
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
5
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
6
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
7
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
9
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
10
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
11
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
12
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
13
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
14
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
15
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
16
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
17
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
18
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
19
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
20
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक

महाराष्ट्रातील राज्यकर्ते दारू उत्पादक

By admin | Updated: July 4, 2015 00:21 IST

लक्ष्मण माने : ‘भटके विमुक्त’ संघटनेतर्फे सोमवारी मोर्चा

कोल्हापूर : महाराष्ट्रातील राज्यकर्ते दारूचे उत्पादक असल्याचा आरोप, माजी आमदार लक्ष्मण माने यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. भटके विमुक्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (दि. ६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.माने म्हणाले, २० जूनला मालवणी, मुंबई येथे विषारी दारू पिऊन १०४ लोक प्राणास मुकले. हे निमित्त करून राज्यभरातील कंजारभाट, पारधी, वडार आणि इतर जमातींच्या वसाहतींवर पोलिसांनी धाडी टाकणे सुरू केले आहे. वस्तुत: दारू काही कंजारभाट, पारधी, वडार किंवा कैकाडी जमाती विकत नाहीत. दारूभट्ट्या तर आता सर्व साखर कारखाने ‘डिस्टिलरी’च्या गोंडस नावाखाली तयार करून राजरोस सरकारदरबारी परवाने घेऊन विकत आहेत. आमचा दारूबंदीस पाठिंबा आहे परंतु ती करायची तर सर्वच प्रकारची दारू बंद करा. शासन ढोंगीपणा करत आहे. पिढ्यान्-पिढ्या दारू गाळण्याचे कौशल्य ज्यांच्याकडे आहे त्यांची हातभट्टी. यामधून निर्माण होणारे अल्कोहोल हे वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रात परदेशातून आयात होणाऱ्या अल्कोहोलऐवजी वापरल्यास शासनाचे कोट्यवधी रुपये वाचतील परंतु आमच्या दारूला विषारी ठरवायचे व राज्यकर्त्यांच्या दारूला प्रतिष्ठा द्यायची हे मनुस्मृतीतील कायद्याला धरूनच आहे.या विरोधात तसेच शहरात माकडवाले, पारधी, डोंबारी, कैकाडी, गोंधळी, भोई, डवरी, जोशी या समाजातील लोकांसाठी राजर्षी शाहू महाराजांनी जागा दिल्या आहेत, परंतु तेथील जागांवर आजतागायत तेथील रहिवाशांची नावे लागलेली नाहीत. या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात होईल. व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीज मार्गावरून हा मोर्चा जाईल.यावेळी शाबू दुधाळे, सज्जनसिंग चितोडिया, समशेरसिंग कलानी, जगन्नाथराव जाधव, विलासराव तामायचीकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)