आरक्षणाविना मराठ्यांच्या पिढ्या बरबाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST2021-02-05T07:04:03+5:302021-02-05T07:04:03+5:30
आजरा : राजकारण्यांच्या तिढ्यामुळे आरक्षणाविना मराठ्यांच्या पिढ्या बरबाद होत आहेत. यापुढे मराठा आरक्षण खेचून आणण्यासाठी मराठा समाजाने एकत्रित काम ...

आरक्षणाविना मराठ्यांच्या पिढ्या बरबाद
आजरा :
राजकारण्यांच्या तिढ्यामुळे आरक्षणाविना मराठ्यांच्या पिढ्या बरबाद होत आहेत. यापुढे मराठा आरक्षण खेचून आणण्यासाठी मराठा समाजाने एकत्रित काम करण्याची गरज आहे. गरज पडल्यास दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची तयारी ठेवा, असे आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले.
आजऱ्यातील मराठा समाजाच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आजरा तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष मारुती मोरे यांनी मराठा महासंघाच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, आजरा तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हण, उपाध्यक्ष बंडोपंत कातकर, कार्याध्यक्ष संभाजी इंजल, सरचिटणीस प्रकाश देसाई, महिलाध्यक्षा रचना होलम, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष सुधीर ऊर्फ आप्पा शिवणे, कार्याध्यक्ष किरण डोमणे, भुदरगडचे तालुकाध्यक्ष आनंदा चव्हाण, कार्याध्यक्ष सूर्यकांत चव्हाण, चंदगडचे तालुकाध्यक्ष अॅड. जितेंद्र मुळीक, कार्याध्यक्ष प्रमोद चोथे यांचा सत्कार करण्यात आला. मराठा महासंघाने राज्यात ३०० पैकी जवळपास १७० तालुक्यांत नवीन संघटन तयार केले आहे. यापुढील काळात गोवा व कर्नाटकमध्येही मराठा संघटन बांधणार असल्याचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे यांनी सांगितले.
मेळाव्यास अवधूत पाटील, सुहास निंबाळकर, कृष्णा हारगुडे, शिवणे गुरुजी यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. अशोक बाचूळकर यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी इंजल यांनी आभार मानले.
-----------------------------
* फोटो ओळी : आजऱ्यातील मराठा महासंघाच्या मेळाव्यात राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मार्गदर्शन केले.
क्रमांक : २७०१२०२१-गड-०९