सेनापती कापशी आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST2021-05-07T04:26:21+5:302021-05-07T04:26:21+5:30

सेनापती कापशी : कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून या लाटेत मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. ग्रामीण भागात मोठ्या ...

RTPCR test at Senapati Kapashi Health Center | सेनापती कापशी आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर चाचणी

सेनापती कापशी आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर चाचणी

सेनापती कापशी : कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून या लाटेत मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याच्या पार्श्वभूमीवर सेनापती कापशी (ता. कागल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर टेस्टचा प्रारंभ करण्यात आला. येथील आरोग्याधिकारी डॉ. विशाल शिंदे, एस. आर. पाटील, आर. डी. पाटील. केमिस्ट आंबोरे, सुपरवायझर खोत व आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचारी, आशा, सेविका, मदतनीस यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याने येथील कोरोना लसीकरण मोहीमही कागल तालुक्यात एक नंबरला झाले आहे.

लस घेण्यासाठी जनजागृती केल्याने लोकांनी येथे मोठी गर्दी केली आहे. लसीकरणास सिरिंजचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्ता घाटगे यांनी लसीकरण करण्यासाठी लागणाऱ्या एक हजार सिरिंज आरोग्य केंद्रास भेट दिल्या.

यापूर्वी कोरोनाची टेस्ट करण्यासाठी एकतर गडहिंग्लज किंवा कागल कोविड सेंटरला जावे लागत होते. वाहतूक व्यवस्था नसल्याने व लॉकडाऊनमुळे कागल अथवा गडहिंग्लजला जाणे शक्य नसल्याने रुग्ण आजार अंगावरच काढत होते. स्थानिक डॉक्टरांनी सल्ला देऊनही परिणामी टेस्ट करण्यासाठी लोक पुढे येत नव्हते. आता कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट करण्याची सोय झाल्याने परिसरातील लोक टेस्ट करण्यासाठी पुढे येथील. विशेषतः किराणा व्यापारी व फळ-पालेभाजीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन आरोग्याधिकारी विशाल शिंदे व एस. आर. पाटील यांनी केले आहे.

फोटो : सेनापती कापशी (ता. कागल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोन आरटीपीसीआर टेस्ट घेताना आर. डी. पाटील.

Web Title: RTPCR test at Senapati Kapashi Health Center