मतदान व मतमोजणी केंद्रावर येणाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST2021-04-30T04:30:40+5:302021-04-30T04:30:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि ‘गोकुळ’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेने खबरदारी म्हणून कडक नियमावली तयार ...

RTPCR is mandatory for those who come to the polling station | मतदान व मतमोजणी केंद्रावर येणाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ बंधनकारक

मतदान व मतमोजणी केंद्रावर येणाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि ‘गोकुळ’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेने खबरदारी म्हणून कडक नियमावली तयार केली आहे. ठरावधारकांचे जागेवरच थर्मल स्कॅनिंग केले जाणार असून मतदान व मतमोजणी केंद्रावर येणाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर मतदान होत असल्याने निवडणूक यंत्रणेने तयारी केली आहे.

मतदान केंद्रासाठी नियुक्ती केलेल्या तीनशे कर्मचाऱ्यांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी आज, शुक्रवारी केली जाणार आहे. याबाबतचा अहवाल दोन दिवसांत मिळाल्यानंतर पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. उद्या, शनिवारी मतदानासाठी लागणारे साहित्य संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. मतदान झाल्यानंतर तहसीलदारांच्या मार्फतच मतपेट्या व अन्य साहित्य जमा करून घेण्यात येणार आहे.

रविवारी सकाळी सातपासून ७० केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. मतदारांचे केंद्राबाहेरच थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिजन तपासणी करण्यात येते. मतदान व मतमोजणी केंद्राच्या परिसरात मास्क वापरणे बंधनकारक आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही ‘आरटीपीसीआर’ चाचणी बंधनकारक असून तपासणीचे प्रमाणपत्र पाहूनच केंद्रावर प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.

Web Title: RTPCR is mandatory for those who come to the polling station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.