शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पुरुष शिक्षकांच्या बरोबरीने महिला आर. एस .पी. शिक्षिकाही स्वत:हून या सेवेसाठी कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 11:25 IST

पुरुष शिक्षकांच्या बरोबरीने महिला आर. एस .पी. शिक्षिकाही स्वत:हून या सेवेसाठी कार्यरत झाल्या आहेत. यामध्ये शहर समादेशक सुरेखा पोवार-मोरबाळे या शिरोली एम.आय.डी.सी., प्रतिभा तळेकर आणि यू. डी. रावराणे या अन्य महिला शिक्षिका अनुक्रमे राजारामपुरी आणि जुना राजवाडा, क्रशर चौक येथे पोलिसांच्या मदतीला धावून गेल्या आहेत.

ठळक मुद्दे कोरोनाविरोधी लढ्यात सक्रिय : ४२ शिक्षकांचा सहभागपोलिसांच्या मदतीला धावून आले आर.एस.पी.चे शिक्षक

प्रदीप शिंदेकोल्हापूर : कोरोना विषाणूचा विळखा तोडण्यासाठी प्रशासन, डॉक्टर आणि पोलीस अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. रस्त्यावर उभे राहून लोकांचे प्रबोधन करून गर्दी हटविताना पोलिसांवर अतिरिक्त ताण वाढत आहे. या पोलिसांच्या मदतीला कोल्हापूर जिल्ह्यातील आर. एस. पी. शिक्षक धावून आले आहेत. कोरोनाविरोधी लढाई फक्त प्रशासनाची नाही, तर प्रत्येक नागरिकाची आहे. हीच जबाबदारी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण (आर.एस.पी. अ‍ॅँड सी. डी.) संघटनेचे चाळीस शिक्षक पोलिसांसोबत विविध ठिकाणी जिल्ह्यात कार्यरत आहेत.

सध्या शाळांना सुट्टी असल्याने आर.एस.पी. शिक्षकांनाही सुट्टी आहे. सामाजिक जबाबदारी ओळखून प्रशासनाच्या कार्याला आपला हातभार लागावा, या उद्देशाने सर्वजण कार्यरत आहेत. जिल्हा उपमहासमादेशक अनिल कुंभार यांनी पुढाकार घेऊन शिक्षकांना आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला चाळीस आर. एस. पी. शिक्षकांनी प्रतिसाद देऊन ते पोलिसांच्या मदतीला धावून आले. स्वत: अनिल कुंभार हे शिरोळ पोलीस ठाण्यामध्ये, विभागीय समादेशक एस. पी. साळवी हे पोलीस मुख्यालय, कसबा बावडा येथे, त्याचप्रमाणे जिल्हा समादेशक एस. एस. पाटील यांनी कोडोली पोलिसांच्या, तर जिल्हा उपसमादेशक श्रीकांत मोरे हे इस्पुर्ली पोलिसांच्या मदतीला धावून गेले आहेत.

पुरुष शिक्षकांच्या बरोबरीने महिला आर. एस .पी. शिक्षिकाही स्वत:हून या सेवेसाठी कार्यरत झाल्या आहेत. यामध्ये शहर समादेशक सुरेखा पोवार-मोरबाळे या शिरोली एम.आय.डी.सी., प्रतिभा तळेकर आणि यू. डी. रावराणे या अन्य महिला शिक्षिका अनुक्रमे राजारामपुरी आणि जुना राजवाडा, क्रशर चौक येथे पोलिसांच्या मदतीला धावून गेल्या आहेत.घरातून डबासर्व ४० शिक्षक स्वत:चा डबा घरातून घेऊन पोलीस बांधवांच्या मदतीस विविध ठिकाणी धावून गेले आहेत. स्वत: पूर्ण सुरक्षेची जबाबदारी घेऊन, जे नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरतात त्यांचे प्रबोधन करण्यासह, विविध चौक, चेकपोस्ट नाके येथे पोलिसांसोबत वाहनांच्या नोंदी घेणे यासारखी कामे करीत आहेत.

 

कोरोनाविरोधी लढ्यात आम्ही उतरलो आहोत. प्रत्येकजण जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस बांधवांचे काम हलके करण्यासाठी कार्यरत आहोत. जिल्ह्यातील ४२ शिक्षक या उपक्रमात सहभागी आहेत.- एस. पी. साळवी, विभागीय समादेशकआर. एस. पी. अ‍ॅँड सीडी

 

आर.एस.पी.कोरोना विषाणूचा विळखा तोडण्यासाठी कोल्हापूर पोलिसांच्या मदतीला कोल्हापूर जिल्ह्यातील आर. एस. पी. शिक्षक धावून आले आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस