शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

Kolhapur: काळम्मावाडी धरणाची गळती काढण्यासाठी ८० कोटी रुपये मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 11:42 IST

धरणाला सुरू असलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या हरित क्रांतीची वरदायीनी असलेले काळम्मावाडी धरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अस्मिता जणू. या धरणाला सुरू असलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या धरणाची गळती काढण्यासाठी ८० कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय मान्यतेवर सही केली आहे. या निधीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.काळम्मावाडी धरणाची साठवण क्षमता २५.४० टीएमसी आहे. परंतु मोठ्या प्रमाणात लागलेल्या गळतींमुळे तो साठा १९.६८ टीएमसी इतका कमी ठेवावा लागायचा. या धरणातून प्रत्येक सेकंदाला साडेतीनशे लिटर हिशोबाने दररोज तीन कोटी लिटर्स एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी गळत्यांमधून वाया जात असे. मोठ्या प्रमाणातील गळत्यांमुळे धरणाच्या बांधावर दाब येऊ नये म्हणून पाणी सोडून दिल्यामुळे धरणात फक्त सहा टीएमसी इतका अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या नद्या आणि कालव्यांच्या भिज अक्षरशः दुष्काळासारखी परिस्थिती जाणवली. शेतीच्या पाणीटंचाईसह पिण्याच्या पाणीटंचाईलाही जिल्ह्याला तोंड द्यावे लागले.येत्या पावसाळ्यापर्यंत गळती काढण्याचे काम पूर्ण झाल्यास येत्या पावसाळ्यापासून पूर्ण म्हणजे २५. ४० टीएमसी इतक्या क्षमतेने पाणीसाठा राहील. त्यामुळे साहजिकच शेतीसह पिण्यासाठीही मुबलक पाणी उपलब्ध होईल. तसेच; कोल्हापूर शहरासाठी दिवाळीपासून सुरू होत असलेल्या थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा २४ तास होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणHasan Mushrifहसन मुश्रीफ