शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर एटीएम खरेदीत कारभाऱ्यांचा ५0 लाखांचा ढपला : शशिकांत खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 11:32 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने वॉटर एटीएम खरेदीसाठी बेकायदेशीर प्रक्रिया राबविण्यात आली असून त्यातून कारभाऱ्यांनी ५० लाखांचा ढपला पाडल्याचा खळबळजनक आरोप माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी केला.

ठळक मुद्देवॉटर एटीएम खरेदीत कारभाऱ्यांचा ५0 लाखांचा ढपला : शशिकांत खोत बेकायदेशीर प्रक्रिया राबविल्याचा आरोप

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्यावतीने वॉटर एटीएम खरेदीसाठी बेकायदेशीर प्रक्रिया राबविण्यात आली असून त्यातून कारभाऱ्यांनी ५० लाखांचा ढपला पाडल्याचा खळबळजनक आरोप माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी केला. खोत यांनी जिल्हा परिषदेत पत्रकार परिषद घेऊन हा आरोप करतानाच उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या कारभाराचा पर्दाफाश करण्याचाही इशारा दिला.खोत म्हणाले, जिल्हा नियोजनमधून यासाठी ६० लाख रुपये तर विशेष घटक योजनेतून २ कोटी २ लाख रुपये या योजनेसाठी प्राप्त झाले. सुरुवातीला पाणीपुरवठा समिती, त्यानंतर स्थायी समितीमध्ये हा विषय चर्चेला येऊन मग तो सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेस येणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता दि. ११ सप्टेंबर २०१८ रोजीच्या सर्वसाधारण सभेतच हा विषय आयत्यावेळी मांडून तो बेकायदेशीररित्या मंजूर करण्यात आला.दुसरीकडे जिल्हा वार्षिक योजनेच्या १९ कामांसाठी सर्वांत कमी निविदा असलेल्या मे. स्पार्टन मॅन्युफॅक्चर्स अ‍ॅन्ड सेलर्स (सांगली) या कंपनीला त्या निधीतील एकही काम दिलेले नाही. त्यांना विशेष घटक योजनेतील काम देण्यात आले आहे.

एकूण ७१ वॉटर एटीएम बसविण्याची असताना ज्यांनी निविदा भरल्या त्यातील सर्वांत कमी रक्कम असणाºया निविदाधारकाला काम देण्याची पद्धत असताना या प्रकरणामध्ये सर्वांनाच काम देण्याची कामगिरी जिल्हा परिषदेने केल्याचा आरोप खोत यांनी केला.ग्रामपंचायतीने जागा, वीज जोडणी द्यायची आणि एवढे करून संबंधित यंत्र बसविणाऱ्या कंत्राटदारालाच तीन वर्षे हे मशीन चालविण्याची जबाबदारी द्यायची, असा हा उलटा कारभार असून हा नवा व्यवसाय सुरू करून देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेने घेतली आहे काय, असा सवालही खोत यांनी उपस्थित केला. यावेळी सदस्य भगवान पाटील, सुभाष सातपुते, बजरंग पाटील उपस्थित होते.दरमहा २५ टक्के रक्कम कारभाऱ्यांनाया वॉटर एटीएममधून महिन्याला जी मिळकत होईल त्यातील २५ टक्के मिळकत कारभाऱ्यांना देण्याचा निर्णय झाला असून त्यानुसार अनेकांची सोय करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. वास्तविक २ लाख ५३ हजार रुपयांची ही यंत्रणा साडेतीन लाखांपेक्षा अधिक दराने खरेदी करण्यात आल्याचा आरोप खोत यांनी केला. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर