सरवडे येथे दूधगंगा नदीत सडलेल्या अवस्थेत मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST2021-05-23T04:24:55+5:302021-05-23T04:24:55+5:30

सरवडे : येथील दूधगंगा नदीपात्रात अंदाजे ३५-४० वर्षांचा पूर्णतः सडलेला व लोखंडी तार, दोरीने दगडाला बांधलेल्या अवस्थेतील अनोळखी मृतदेह ...

Rotten body in Dudhganga river at Sarvade | सरवडे येथे दूधगंगा नदीत सडलेल्या अवस्थेत मृतदेह

सरवडे येथे दूधगंगा नदीत सडलेल्या अवस्थेत मृतदेह

सरवडे : येथील दूधगंगा नदीपात्रात अंदाजे ३५-४० वर्षांचा पूर्णतः सडलेला व लोखंडी तार, दोरीने दगडाला बांधलेल्या अवस्थेतील अनोळखी मृतदेह सापडला आहे. मृतदेह पूर्णत: सडलेला असल्याने जागेवरच पंचनामा करण्यात आला.

मृतदेहाची ओळख पटणे मुश्किल झाले आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे. अज्ञातांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याने खून अथवा घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राधानगरी-निपाणी मार्गावर सरवडे पुलाच्या खालील बाजूस दूधगंगा नदीपात्रात मांगेवाडी हद्दीत शेतातील लोकांना पाण्यात तरंगणारा मृतदेह दिसला. याची माहिती मांगेवाडीच्या पोलीस पाटील वंदना गुरव यांना देण्यात आली. मृतदेह प्लास्टिकच्या बारदानात गुंडाळून कंबर, छाती, खांद्याला दोरी, लोखंडी तार तसेच मोठमोठे दगड बांधलेल्या व सडलेल्या अवस्थेत तरंगत होता. तो जेसीबीच्या साहाय्याने पाण्याबाहेर काढण्यात आला.

मृतदेह पूर्णतः सडल्याने डॉक्टरांच्या पथकाने जागेवरच पंचनामा केला. डॉक्टर व पोलिसांनी प्राथमिक अंदाजाने तो पुरुष जातीचा व ३५-४० वयाचा असल्याचे सांगितले. मृतदेहाचे काही अवशेष पुढील तपासासाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविले.

पोलिसांनी हा खून अथवा घातपाताचा संशय व्यक्त करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा अज्ञातांनी प्रयत्न केला असल्याचे सांगितले. तसेच ८-१० दिवसांत कोणतीही हरविल्याची (मिसिंग) तक्रार नोंदविली नसल्याचे सांगितले. याबाबत कोणास माहिती द्यायची असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मृतदेहाची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर एक आवाहन आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसांत केली असून पोलीस निरीक्षक उदय डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Rotten body in Dudhganga river at Sarvade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.