रोटरीचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:45+5:302021-07-14T04:27:45+5:30

शिरोळ : रोटरीचे कार्य खूप मोठे असून, रोटरी तळागळातील लोकांपर्यंत पोहोचत आहे. समाजोपयोगी उपक्रम राबवून शिरोळ रोटरी पुन्हा आपले ...

Rotary's major contribution to the social sphere | रोटरीचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान

रोटरीचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान

शिरोळ : रोटरीचे कार्य खूप मोठे असून, रोटरी तळागळातील लोकांपर्यंत पोहोचत आहे. समाजोपयोगी उपक्रम राबवून शिरोळ रोटरी पुन्हा आपले नाव आणखी उंचावेल, असा विश्वास डिस्ट्रिक्ट सचिव डॉ. मोनिका कुल्लोळी यांनी व्यक्त केला.

येथील रोटरी क्लबचा टारे हाऊस सभागृहात तेरावा पदग्रहण समांरभ उत्साहात पार पडला. यावेळी नूतन अध्यक्ष दीपक ढवळे, सचिव सचिन देशमुख, ट्रेझरर संदीप बावचे यांच्यासह नूतन पदाधिकारी, सदस्यांचा सत्कार करण्यात आला. शिवाय विविध श्रेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व विद्यार्थिनींचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, असिस्टंट गव्हर्नर रुस्तम मुजावर, भाऊसोा नाईक, राजेश सानिकोप, उपनगराध्यक्ष राजेंद्र माने, मोहन माने, पंडित काळे, विजय माळी, बाळासोा शेट्टी, नितीन शेट्टी, अविनाश टारे, श्रीकांत शिरगुप्पे, बापूसोा गंगधर, शरद चुडमुंगे यांच्यासह जयसिंगपूर, कुरूंदवाड, शिरोळ रोटरी क्लब व लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. फोटो - १२०७२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - शिरोळ येथे रोटरी क्लबचा पदग्रहण कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. मोनिका कुल्लोळी, दीपक ढवळे, सचिन देशमुख, रुस्तम मुजावर, भाऊसोा नाईक यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Rotary's major contribution to the social sphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.