रोटरी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत जाऊन काम करते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST2020-12-09T04:19:16+5:302020-12-09T04:19:16+5:30
इचलकरंजी रोटरी क्लबचा वर्धापनदिन उत्साहात लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : रोटरी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत जाऊन काम करते. कोल्हापूर व ...

रोटरी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत जाऊन काम करते
इचलकरंजी रोटरी क्लबचा वर्धापनदिन उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : रोटरी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत जाऊन काम करते. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत कोरोना काळात रोटरीने शासनासोबत सर्वतोपरी मदतकार्य उभारले, असे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्टचे सचिव अमरदीप पाटील यांनी केले.
येथील रोटरी क्लबचा वर्धापनदिन उत्साहात झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
सुरुवातीला मान्यवरांनी रोटरीच्या अॅक्शन बुलेटीनचे प्रकाशन केले. त्यानंतर दिव्यांग महिलेस कुबडी व जांभळी (ता. शिरोळ) येथील देशी झाडांच्या संगोपनासाठी मदत करण्यात आली. दीपक निंगुडगेकर यांनी रोटरीच्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली. अभय यळरुटे यांनी स्वागत केले. कार्यक्रमास शरद देसाई, पंकज कोठारी, श्रीनिवास मालू, महेंद्र मुथा यांच्यासह सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन मीनाक्षी तंगडी यांनी केले. संजय घायतिडक यांनी आभार मानले.
(फोटो ओळी)
०८१२२०२०-आयसीएच-०५
इचलकरंजीत रोटरी क्लबच्या वर्धापनदिनानिमित्त जांभळी येथील देशी झाडांच्या संगोपनासाठी पाण्याच्या टाकीसाठी मदत देण्यात आली. यावेळी अमरदीप पाटील, अभय यळरुटे, मनीष मुनोत, भाऊ नाईक, आदी उपस्थित होते.