किडन्या निकामी झालेल्या युवकास रोटरीची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:52 IST2020-12-05T04:52:32+5:302020-12-05T04:52:32+5:30
राजेंदर शिंदे हे एस.टी.मध्ये सेवेत होते. मात्र, त्यांच्या अभियांत्रिकी शिकणाऱ्या मुलाला ताप आल्यानंतर त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान ...

किडन्या निकामी झालेल्या युवकास रोटरीची मदत
राजेंदर शिंदे हे एस.टी.मध्ये सेवेत होते. मात्र, त्यांच्या अभियांत्रिकी शिकणाऱ्या मुलाला ताप आल्यानंतर त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. शिंदे यांनी अपघातामुळे निवृत्ती घेतली आहे. अशातच मुलावर उपचार करण्यासाठी ७ लाख रुपये खर्च येणार होता.
या तीनही संस्थांच्या माध्यमातून वैद्यकीय उपचारासाठी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमामध्ये रोटरीचे प्रांतपाल संग्राम पाटील यांच्या हस्ते शिंदे कुटुंबीयांना मदत देण्यात आली. यावेळी क्लबचे अध्यक्ष बाबा जांभळे, सचिव अनुप पाटील, सहप्रांतपाल बाळासाहेब कडोलकर यांच्यासह क्लबचे सदस्य उपस्थित होते.
०३१२२०२० कोल रोटरी क्लब