शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय विवाहकर्त्यांच्या पाठबळासाठी जिल्ह्याला कक्ष, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गृह विभागाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 12:46 IST

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अजूनही अनेक ठिकाणी छळवणुकीला तोंड द्यावे लागते.

समीर देशपांडेकोल्हापूर : जनमानसातील जातीपातीचा पगडा अजूनही गेलेला नसल्यामुळे आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अजूनही अनेक ठिकाणी छळवणुकीला तोंड द्यावे लागते. या सर्व प्रकारांना आळा घालून अशा जोडप्यांना पाठबळ देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आणि पोलिस आयुक्तालयात एका विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने हे पाऊल उचलले आहे. शक्ती वाहिनी या संघटनेने ऑनर किलिंग आणि खाप पंचायतसंदर्भात सर्वाेच्च न्यायालयात २०१० साली याचिका दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने २७ मार्च २०१८ रोजी सर्वाेच्च न्यायालयाने काही आदेश दिले होते. या आदेशातील परिच्छेद क्रमांक ५३ मध्ये केंद्र शासन आणि संबंधित राज्य शासन यांनी काय कार्यवाही करायची आहे, याबाबत निर्देश दिले होते.त्यानुसार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची छळवणूक आणि धमकावल्याप्रकरणी तक्रारी स्वीकारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आणि पोलिस आयुक्तालयात हा विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.सर्वसाधारणपणे अशा तक्रारी पोलिसांत दिल्यानंतर त्यांचा अन्य तक्रारींबरोबरच तपास केला जातो. त्यामुळे तातडीने याबाबत कारवाई होत नाही. परिणामी, अशा आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना आणखी गंभीर प्रकारांना सामोरे जावे लागते; परंतु या विशेष कक्षाचे प्रमुख जिल्हा पोलिस प्रमुख राहणार असल्याने साहजिकच या अर्जांवर तातडीने कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.

कक्षामध्ये यांचा समावेशया विशेष कक्षामध्ये जिल्हा पातळीवर जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांचा समावेश असेल तर पोलिस आयुक्त कार्यालयात त्यांच्यासह जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांचा समावेश असेल. पोलिस अधीक्षक आणि आयुक्त हे या कक्षाचे प्रमुख असतील.

जर अशा पद्धतीचा विशेष कक्ष स्थापन होणार असेल आणि या तक्रारी थेट जिल्हा पोलिस प्रमुखांकडून हाताळल्या जाणार असतील ते चांगले आहे. यामुळे किमान आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना पालकांकडून किंवा नातेवाइकांकडून होणारा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा आहे. -तनुजा शिपूरकर, सामाजिक कार्यकर्त्या

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्न