‘रोल मॉडेल’ मलकापुरात अतिसाराची साथ

By Admin | Updated: July 18, 2015 00:13 IST2015-07-18T00:01:31+5:302015-07-18T00:13:43+5:30

अडीचशे रुग्ण : पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले

'Role Model' with Alkasara in Malkapur | ‘रोल मॉडेल’ मलकापुरात अतिसाराची साथ

‘रोल मॉडेल’ मलकापुरात अतिसाराची साथ

मलकापूर : जलशुद्धीकरण प्रकल्प व चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या मलकापूर शहरात अतिसाराची लागण झाली आहे. दूषित पाण्यामुळे ही साथ पसरल्याची दाट शक्यता असून, शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये सुमारे अडीचशे रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
दरम्यान, नगरपंचायत प्रशासनाने तातडीने ३९ ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी संकलित केले आहेत. शुक्रवारी दुपारी हे नमुने सातारा येथे पाठविले आहेत. पाणी शुद्धीकरणाच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या जात असल्याचे प्रशासनाने सांगितले. शहरातील कोयना वसाहत व आगाशिवनगर भागात ही साथ पसरली असून,इतर भागातही साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगाशिवनगर व कोयना वसाहत या भागातील सुमारे अडीचशे जणांना गुरुवारपासून जुलाब व उलट्यांचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्रास वाढतच असल्याने अखेर नागरिकांनी रुग्णालयाचा रस्ता धरला. शहरात सुमारे पंधरा खासगी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत अतिसाराचे सुमारे अडीचशे रुग्ण दाखल झाले. त्यांच्यावर तातडीने उपचारही करण्यात आले आहेत. शहरात अतिसाराची लागण झाल्याने नगरपंचायत प्रशासनही हबकले आहे. नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा व आरोग्य विभागाने शहरातील ३९ ठिकाणचे पाणी नमुने तपासले. (प्रतिनिधी)





काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे
डॉ. किशोर काळे, डॉ. नितीन अष्टवणे यांच्यासमक्ष पाणी तपासून क्लोरीनचा डोस कमी केलेला आहे. नागरिकांनी दोन दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे.
- राजेंद्र तेली, मुख्याधिकारी
पावसाळ्याचा विचार करून क्लोरीन गॅसचा डोस वाढविला होता. मात्र, पाऊस बंद झाल्यानंतर क्लोरीनचा डोस कमी करणे गरजेचे होते. तो तसाच राहिल्यामुळे नागरिकांना पोटदुखी व जुलाबाचा त्रास होत आहे. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
- यू. पी. बागडे
जलअभियंता, पाणीपुरवठा विभाग

Web Title: 'Role Model' with Alkasara in Malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.