व्यापार, उद्योग क्षेत्रांना संकटकाळी आधार देण्याची सरकारची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:24 IST2021-04-27T04:24:05+5:302021-04-27T04:24:05+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या काळातील लॉकडाऊन, आदी निर्बंधांमुळे व्यापार-उद्योग क्षेत्र अडचणीत असल्याची केंद्र सरकारला पूर्ण जाणीव आहे. व्यापार-उद्योग क्षेत्राच्या अडचणी ...

व्यापार, उद्योग क्षेत्रांना संकटकाळी आधार देण्याची सरकारची भूमिका
कोल्हापूर : कोरोनाच्या काळातील लॉकडाऊन, आदी निर्बंधांमुळे व्यापार-उद्योग क्षेत्र अडचणीत असल्याची केंद्र सरकारला पूर्ण जाणीव आहे. व्यापार-उद्योग क्षेत्राच्या अडचणी सोडवून सहाय्य करण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. मात्र, आता प्राधान्याने कोरोना संसर्ग रोखणे, आरोग्य सुविधा वाढविण्याला प्राधान्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी केले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स फेडरेशनतर्फे आयोजित विशेष मार्गदर्शन सभेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. ललित गांधी यांनी लॉकडाऊनमुळे व्यापार-उद्योग व सेवा क्षेत्र अडचणीत आल्याचे सांगितले. कर्जाची पुनर्रचना, व्याजात सवलत, कमी व्याजाने कर्जपुरवठा यांचा समावेश असलेल्या पॅकेजची मागणी केली. जीएसटी आयकर विवरणपत्रे, कर भरण्यास मुदतवाढीची मागणी केली. व्यापारी-उद्योगांना लॉकडाऊन काळात येणाऱ्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी वाणिज्य मंत्रालयातर्फे वॉर रुम तयार केली आहे. तिच्या माध्यमातून सर्व राज्य सरकारांशी समन्वय करून तत्काळ मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मंत्री गोयल यांनी सांगितले. या चर्चेत आशिष पेडणेकर, उमेश दाशरथी, घनश्याम गोयल, श्रीराम दांडेकर, शुभांगी तिरोडकर, संजय दादलिका, अनिलकुमार लोढा यांनी व्यापार, उद्योग क्षेत्राच्या विविध समस्या मांडल्या.
मंत्री गोयल म्हणाले,
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व्यापार, उद्योग क्षेत्राने सहकार्य करावे.
जमीन संपादन, आर्थिक सहभागाची पूर्तता करून कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचे काम लवकर सुरु करु.
फोटो (२६०४२०२१-कोल-ललित गांधी (उद्योग) : केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी राज्यस्तरीय व्यापार-उद्योग बैठकीच्या निमित्ताने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी संवाद साधला.
===Photopath===
260421\26kol_1_26042021_5.jpg
===Caption===
फोटो (२६०४२०२१-कोल-ललित गांधी (उद्योग) : केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी राज्यस्तरीय व्यापार-उद्योग बैठकीच्या निमित्ताने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी संवाद साधला.