रोहित पवार, नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते बाचणीत पूरग्रस्तांना धान्यवाटप.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:26 IST2021-07-30T04:26:17+5:302021-07-30T04:26:17+5:30

यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व गोकूळचे संचालक नवीद मुश्रीफ ...

Rohit Pawar, Naveed Mushrif distribute foodgrains to flood victims. | रोहित पवार, नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते बाचणीत पूरग्रस्तांना धान्यवाटप.

रोहित पवार, नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते बाचणीत पूरग्रस्तांना धान्यवाटप.

यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व गोकूळचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी अनेक लोकाभिमुख उपक्रम सुरू ठेवले आहेत. वैद्यकीय सेवेपासून, नोकर भरती प्रशिक्षण, गरजूंना आर्थिक मदत, तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित कुटुंबीयांना धान्य वाटप अशा विधायक उपक्रमांचे या फाउंडेशनचे काम कौतुकास्पद आहे.

आमदार पवार व नवीद मुश्रीफ यांनी सुरुवातीला दूधगंगा नदीकाठी जाऊन पूर बाधित क्षेत्राची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच सूर्यकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ फराकटे, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, निवास पाटील, प्रकाश पाटील, पांडुरंग पाटील -तात्या, सरपंच इक्बाल नायकवडी, सुभाष चौगुले, मारुती दौलू पाटील, उत्तम चौगुले, नामदेव सडोलकर, पीटर डिसोझा, आदी प्रमुख उपस्थित होते.

२९ रोहित पवार मदत

फोटोओळी बाचणी, ता. कागल येथे महापूर बाधितांना नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने धान्याचे वाटप झाले. यावेळी आमदार रोहित पवार, गोकूळचे संचालक नवीद मुश्रीफ, सूर्यकांत पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, मनोजभाऊ फराकटे व इतर प्रमुख.

Web Title: Rohit Pawar, Naveed Mushrif distribute foodgrains to flood victims.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.