शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
3
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
4
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
5
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
6
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
7
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
8
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
9
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
10
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
11
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
12
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
13
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
14
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
15
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
16
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
17
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
18
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
19
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
20
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...

रोहित दळवी ‘सुनील श्री’चा मानकरी- : लिंगनूरमध्ये शहीद जवान सुनील जोशिलकर स्मृतिदिनी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 01:02 IST

गडहिंग्लज : लिंगनूर काा नूल (ता. गडहिंग्लज) येथील शहीद जवान सुनील शंकर जोशिलकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त शहीद जवान सुनील ...

ठळक मुद्दे६० स्पर्धकांचा सहभाग

गडहिंग्लज : लिंगनूर काा नूल (ता. गडहिंग्लज) येथील शहीद जवान सुनील शंकर जोशिलकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त शहीद जवान सुनील जोशिलकर फौंडेशनतर्फे आयोजित खुल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत नेसरीच्या रोहित दळवी याने ‘सुनील श्री’चा किताब पटकाविला. त्याला रोख ५५५५ व चषक देऊन गौरविण्यात आले. रणजित चौगुले (बेस्ट पोझर, गारगोटी), अमोल ºहाटवळ (बेस्ट डेव्हलपर, बेकनाळ), राजेंद्र जाधव (बेस्ट बायसेफ, करंबळी), रोहित भोगण (बेस्ट थाईज, कोवाड) यांचा सत्कार झाला. स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष होते.

स्पर्धेत गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल व भुदरगड तालुक्यांतील ६० स्पर्धकांनी भाग घेतला. प्रारंभी शहीद जवान सुनील यांच्या प्रतिमेचे पूजन गटविकास अधिकारी सीमा जगताप यांच्या हस्ते करण्यात झाले. यावेळी पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंके, अनुप पाटील, ऋतुराज रणनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गटनिहाय विजेते अनुक्रमे असे : ० ते ५५ किलो गट- मुकुंद मुसळे (हणबरवाडी), सचिन शिंगे (पेद्रेवाडी), रोहित निकम (कागल), आेंकार यमगेकर (उत्तूर), शुभम गुरव (गडहिंग्लज).५५ ते ६० किलो गट - ओंमकार शिंदे (गडहिंग्लज), मयूर कांबळे (गारगोटी), सूरज केणे (गारगोटी), राहुल परीट (गडहिंग्लज), अजित लमतुरे (आजरा).

६० ते ६५ किलो गट - अमोल ºहाटवळ (बेकनाळ), रॉनी लाखे (गडहिंग्लज), जालंदर मोरे (वडरगे), अनिल मोहनगेकर (कुदनूर), सौदागर खटके (करंबळी). ६५ ते ७० किलो - रणजित चौगुले (गारगोटी), विजय सूर्यवंशी (गडहिंग्लज), रोहित भोगण (कोवाड), चेतन चव्हाण (गडहिंग्लज), विशाल येसणे (मडिलगे).७० किलो गट - रोहित दळवी (नेसरी), राजेंद्र जाधव (करंबळी), कैयूम नदाफ (गडहिंग्लज), अमोल राऊत (मुरगूड), अभिजित सुतार (गडहिंग्लज) यांनी यश मिळविले. प्रा. के.बी. केसरकर, संजय धुरे, झाकीर नदाफ यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेसाठी फौंडशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. महेश जोशिलकर यांनी स्वागत केले. बाळासाहेब मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय जोशिलकर यांनी आभार मानले.यावेळी १०९ टी. ए. बटालियनचे बेस्ट जवान म्हणून निवड झालेले लान्सनायक संदीप कृष्णा कोरे (खमलेहट्टी) यांचा गौरव झाला.लिंगनूर काा नूल (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. डावीकडून अविनाश जोशिलकर, परशराम जोशिलकर, बाळासाहेब मुल्ला, सुधाकर शिंदे, के. बी. केसरकर, विठ्ठल जाधव, सुरेश धुरे, पप्पू जोशिलकर, रवी जाधव, आदी उपस्थित होते.

लिंगनूर काा नूल (ता. गडहिंग्लज) येथील शहीद जवान सुनील शंकर जोशिलकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त शहीद जवान सुनील जोशिलकर फौंडेशनतर्फे आयोजित खुल्या शरीरसौष्ठव

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWeightliftingवेटलिफ्टिंग