‘कुंभी-कासारी’त रोडरोमिओंचा उच्छाद

By Admin | Updated: December 17, 2014 23:09 IST2014-12-17T20:35:58+5:302014-12-17T23:09:37+5:30

दररोजचाच धिंगाणा : प्रेमवीरास जाब विचारणाऱ्या नातेवाइकांना मारहाण

Rodromein burial in 'Kumbh-kasari' | ‘कुंभी-कासारी’त रोडरोमिओंचा उच्छाद

‘कुंभी-कासारी’त रोडरोमिओंचा उच्छाद

कोपार्डे : कुंभी-कासारी कारखाना परिसरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांच्या छेडछाडीबाबत जाब विचारणाऱ्या नातेवाइकांना छेडछाड करणारा युवक व त्याच्या मित्रांकरवी बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत कॉलेज प्रशासन असह्य, तर करवीर पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे ‘रोडरोमिओं’ना बळ आले आहे. रोडरोमिओंना कोण आळा घालणार, असा प्रश्न पालक व शाळा व्यवस्थापन यांना पडला आहे.
कुंभी-कासारी कारखान्यावर दोन कनिष्ठ महाविद्यालय, एक वरिष्ठ महाविद्यालय, चार माध्यमिक शाळा, दोन वस्तीशाळा, एक औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, तर चार संगणक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. या शैक्षणिक संस्थांमध्ये करवीर, पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा व शाहूवाडी या पाच तालुक्यांतील ग्रामीण भागातील विद्यार्थी येतात. त्यामध्ये मुलींची संख्या मोठी आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून येथे रोडरोमिओंनी उच्छाद मांडला असून, परिसर मुलींसाठी असुरक्षित बनत चालला आहे.
सकाळी सहा ते साडेसात दरम्यान शाळा-कॉलेजसाठी मुली सांगरूळ फाटा (कोपार्डे) येथे एस.टी.ने येतात. तेथून त्या शिक्षणसंस्थांत अर्धा किलोमीटर चालत येतात. या रस्त्यादरम्यान मुलींची छेडछाड करणे मुलींच्या आडवी गाडी मारणे, असे प्रकार सर्रास सुरू झाल्याने मुली, पालक व शिक्षकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीने रोडरोमिओंविरोधात नातेवाइकांकडे तक्रार केल्यानंतर आज त्याला जाब विचारला. यावेळी शाळेत दंगा सुरू झाला.
येथील कर्मचाऱ्यांनी तो वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. तरीही शाळेच्या बाहेर गेल्यानंतर या रोडरोमिओने आपल्या मित्रांना बोलावून घेत नातेवाइकांनाच बेदम मारहाण केली आहे. (वार्ताहर)

असे प्रकार घडू नयेत यासाठी करवीर पोलिसांकडून समुपदेशन कार्यक्रम घेतले. मुलांना कायदा काय आहे याबाबत माहिती दिली; पण शाळाबाह्य मुले असा प्रकार करतात. तोही रस्त्यावर. त्यामुळे आम्हालाही मर्यादा येत आहेत.
- एम. के. आळवेकर, प्राचार्य,
श्रीराम ज्युनिअर कॉलेज.

आता कायद्याचा धाक हाच एक उपाय आहे. आम्ही सर्व पातळीवर येथे त्रास देणाऱ्या मुलांचे प्रबोधन केले. आता पालक, मुली यांनी सजगता बाळगून अशा ‘रोडरोमिओंना धडा शिकविला पाहिजे.
- बी. एल. पाटील, उपप्राचार्य.

Web Title: Rodromein burial in 'Kumbh-kasari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.