शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कळे येथील सराफ पेढीवर दरोडा, सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:21 IST

कळे (ता. पन्हाळा) येथील मध्यवर्ती बाजारपेठेतील प्रियांका ज्वेलर्स सराफ पेढी फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिण्यासह मोठी रोकड लंपास केल्याचे सोमवारी पहाटे उघडकीस आले. या दरोडा प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली. यापूर्वीही या पेढीवर दरोड्याचा प्रयत्न झाला होता. कुत्री भुंकल्याने चोरटे पसार झाले होते.

ठळक मुद्देकळे येथील सराफ पेढीवर दरोडासोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोकड लंपास

कोल्हापूर/कळे : कळे (ता. पन्हाळा) येथील मध्यवर्ती बाजारपेठेतील प्रियांका ज्वेलर्स सराफ पेढी फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिण्यासह मोठी रोकड लंपास केल्याचे सोमवारी पहाटे उघडकीस आले. या दरोडा प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली. यापूर्वीही या पेढीवर दरोड्याचा प्रयत्न झाला होता. कुत्री भुंकल्याने चोरटे पसार झाले होते.१ फेब्र्र्रुवारी २०१९ रोजी कुडित्रे (ता.करवीर) येथील यशवंत सहकारी बँकेच्या कळे (ता. पन्हाळा) शाखेवर चोरट्यांनी दरोडा टाकून रोख साडे आठ लाखांसह २४४ तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे ७४ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेला दहा महिने पूर्ण होतात तोपर्यंत सराफ पेढीवर दरोडा टाकला. बँकेपासून हाकेच्या अंतरावरचं ही सराफ पेढी आहे.कळे येथे मुख बाजारपेठेत रस्त्याला लागून अरुण पाटील (रा. कळंबा, ता. करवीर) यांची व्यापारी संकुलची तिन मजली इमारत आहे. पहिल्या मजल्यावर पाटील यांचे सराफी दूकान आहे. तळ मजल्यावर जितु पुरोहित यांचे कापड दूकान आहे. ते याच ठिकाणी राहतात.सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास उठून बाहेर आलेनंतर त्यांना पहिल्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्यावरील प्रवेशद्वाराच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी पाटील यांना फोन करुन माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येवून पाहिले असता दूसऱ्या मजल्यावर राहत असलेल्या रुमसह सहा दरवाजाचे शर्टरचे कुलूप तोडलेले दिसले. तेथून चोरट्यांनी पहिल्या मजल्यावरील सराफी दूकानात प्रवेश केला.

कपाटासह लॉकर व कौंन्टरमधील सोन्या-चांदीचे दागिन्यासह रोकड लंपास करुन पसार झालेचे निदर्शनास आले. पाटील यांनी हाकेच्या अंतरावर असलेल्या कळे पोलीसांना वर्दी दिली.सहायक निरीक्षक श्रीकांत इंगवले टिमसह घटनास्थळी आले. ठसेतज्ज्ञांनी पाहणी करून श्वानाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता ते रस्त्यावरच घुटमळले. याच इमारतीमध्ये कोल्हापूर अर्बन बँकेची शाखा आहे. कळे-बाजारभोगाव मेन रोडवरील या सराफी दूकानात दरोडा पडल्याने नागरिकांत भीती पसरली.चोरटा सीसीटीव्हीतइमारतीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता एक चोरटा हातामध्ये कटावणी घेवून जाताना दिसून आला. अंदाजे ३५ वर्षाचा असून अंगाने तगडा आहे. तोंडाला काळा मास्क बांधला आहे. अंगात काळे जॅकेट आहे. त्याचे हालचालीवरुन तो सराईत असल्याचे पोलीसांनी सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर