शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते, पाण्यासाठी रास्ता रोको इचलकरंजीत नागरिक संतप्त : नगराध्यक्षांना घेराव, काही काळ तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:53 IST

इचलकरंजी : येथील विक्रमनगरमधील आरगे भवन व इंदिरानगर परिसरात रस्ते, पिण्याचे पाणी, अशा नागरी सुविधांचा अभाव असल्यामुळे स्थानिक संतप्त नागरिकांनी सोमवारी थोरात चौकात उत्स्फूर्तपणे रास्ता

इचलकरंजी : येथील विक्रमनगरमधील आरगे भवन व इंदिरानगर परिसरात रस्ते, पिण्याचे पाणी, अशा नागरी सुविधांचा अभाव असल्यामुळे स्थानिक संतप्त नागरिकांनी सोमवारी थोरात चौकात उत्स्फूर्तपणे रास्ता रोको केला. सुमारे अर्धा तास झालेल्या या आंदोलनानंतर आंदोलक नगरपालिकेत गेले आणि त्यांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांना घेराव घातला. यावेळी त्यांच्या दालनातच ठिय्या मारल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

विक्रमनगर परिसरातील इंदिरानगर, आरगे भवन या परिसराबरोबर शांतीनगर येथील नागरी वसाहतीतील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्याचबरोबर नळाला दूषित पाणी येत असून, काही ठिकाणी पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. याबाबत नगरपालिकेकडे वारंवार मागणी करूनसुद्धा दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी नगरसेवक महेश कांबुरे, माजी नगरसेवक श्रीरंग खवरे यांच्यासह सोमवारी थोरात चौकात रास्ता रोको केला.

आंदोलनामुळे या प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यामुळे आंदोलकांनी आपला मोर्चा नगरपालिकेकडे वळविला.आंदोलक थेट नगराध्यक्षा स्वामी यांच्या दालनात आले. महिला-पुरुष आंदोलकांनी नगराध्यक्षांना घेराव घालून त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. दरम्यान, उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, मुख्याधिकारीडॉ. प्रशांत रसाळ, जलअभियंता सुरेश कमळे, नगर अभियंता बापूसाहेब चौधरी, आदी नगराध्यक्षांच्या दालनात आले. आंदोलकांनी त्यांनाही धारेवर धरले. अखेर संबंधित कंत्राटदाराकडून सुमारे महिन्याभरात रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल आणि दरम्यानच्या काळात पाणीपुरवठा सुस्थितीत आणण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे आंदोलन संपुष्टात आले.इचलकरंजीत नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्यासमोर नागरिकांची कैफियत मांडली. यावेळी माजी नगरसेवक श्रीरंग खवरे, नगरसेवक तानाजी पोवार, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, जलअभियंता सुरेश कमळे, भाऊसाहेब आवळे, महेश कांबुरे, नितीन पाटणी, नगरअभियंता बापूसाहेब चौधरी आंदोलक उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंपWaterपाणी