शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील रस्ते बनले जीवघेणे; महापालिका अधिकाऱ्याच्या आईचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 13:51 IST

कोल्हापूर : कणेरकरनगरातील महिला भोवळ येऊन रस्त्यावर पडल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना दि. ११ ऑक्टोबरला घडली; परंतू दुचाकीवरुन ...

कोल्हापूर : कणेरकरनगरातील महिला भोवळ येऊन रस्त्यावर पडल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना दि. ११ ऑक्टोबरला घडली; परंतू दुचाकीवरुन जात असताना दुचाकी खड्ड्यात आदळल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा संशयही व्यक्त होत आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडे कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीस असलेले जयेश जाधव हे त्यांची आई वैशाली प्रतापराव जाधव (वय ५९) यांच्यासह दुचाकीवरून निघाले होते. वैशाली यांना कमी रक्तदाबाचा त्रास होता. गाडीवरून जाताना त्यांना भोवळ आल्यासारखे झाले म्हणून जयेश यांनी गाडी थांबविली. त्यावेळी त्या गाडीवरुन खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली, तसा जबाब जुना राजवाडा पोलिसांत जयेश यांनी त्याचवेळी नोंदविला. त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना वैशाली यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.उत्तरकार्याचा विधी झाल्यानंतर सोशल मीडियावर शुक्रवारी जाधव यांचा मृत्यू रस्त्यातील खड्ड्यांमुळेच झाल्याची बातमी व्हायरल झाली. त्यामुळे पोलीस, महानगरपालिका यंत्रणा खडबडून जागी झाली. जयेश जाधव यांना पोलीस ठाण्यात येण्याचा निरोप पोलिसांतर्फे देण्यात आला. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. एस. पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली. जेथे ही महिला पडली त्या परिसराची पाहणी केली. पोलीस रेकॉर्डवर खड्ड्यामुळे पडल्याने मृत्यू झाल्याचे आले नसले तरी त्या परिसरात रस्त्याला मोठ मोठे खड्डे असल्याचे वास्तव आहे. जाधव हे महापालिकेच्याच पाणीपुरवठा विभागात काम करतात. त्यामुळे त्यांनाच महापालिकेच्या यंत्रणेच्या विरोधात भूमिका घेण्यास अडचणी आल्याने त्यांच्या आईचा मृत्यू हा भोवळ येऊन पडल्याने झाला असे कारण त्यांनी दिले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.जीव जावा असेच रस्ते..कोल्हापूर शहरातील रस्त्यांची स्थिती ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांचीच नव्हे तर कुणाचीही आई गाडीवरून पडून गतप्राण होईल अशीच आहे. पावसाळ्यात घाईगडबडीत केलेल्या रस्त्यांची खडी पुरती उखडली आहे. या अपघातानंतर शुक्रवारपासून रस्त्याच्या पॅचवर्कचे काम तातडीने सुरू झाले हा योगायोग नव्हे तर त्याचा परिणामच असावा, असेही म्हटले जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूकAccidentअपघात