विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यासाठी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:28 IST2021-08-20T04:28:49+5:302021-08-20T04:28:49+5:30
बांबवडे : कोरोनाकाळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत या मागणीसाठी ...

विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यासाठी रास्ता रोको
बांबवडे : कोरोनाकाळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यासंदर्भातील निवेदन पोलीस निरीक्षक विजय पाटील यांना देण्यात आले.
श्रीकांत कांबळे यांनी मागणी केली की, ग्रामीण भागातील विद्यार्थी हे पोलीस, सैनिक भरतीसाठी प्रयत्न करत असतात. शाहूवाडी तालुक्यातील बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. हे विद्यार्थी गरीब, शेतकरी कुटुंबातील असतात. त्यांच्यावर जर गुन्हे नोंद झाले तर त्यांना १८८ कलम अंतर्गत सहा महिने शिक्षा व १००० रुपये दंड होऊ शकतो. याचा परिणाम त्यांचे करिअर धोक्यात येऊ शकते आणि हे होऊ नये यासाठी ज्या विद्यार्थ्यांच्या हातून नकळत गुन्हे घडले आहेत, त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, असे निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. आंदोलनात अश्वशिला कांबळे, अमोल कांबळे, दयानंद कांबळे, आकाश कांबळे , दयानंद शिवजातक, किशोर घोलप, प्रदीप माने आदींसह भारतीय दलित महासंघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
१९ बांबवडे रास्ता रोको
फोटो : विद्यार्थ्यांच्या वरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने बांबवडे येथे केलेले रास्ता रोको आंदोलन.