इचलकरंजीतील रस्त्यांची कामे माॅन्सूनपूर्व करावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:18 IST2021-06-05T04:18:20+5:302021-06-05T04:18:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : माॅन्सूनच्या आगमनाला सुरुवात होत असून शहर व परिसरातील रस्त्यासह इतर सर्व कामे माॅन्सूनपूर्व पूर्ण ...

Road works in Ichalkaranji should be done before monsoon | इचलकरंजीतील रस्त्यांची कामे माॅन्सूनपूर्व करावीत

इचलकरंजीतील रस्त्यांची कामे माॅन्सूनपूर्व करावीत

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : माॅन्सूनच्या आगमनाला सुरुवात होत असून शहर व परिसरातील रस्त्यासह इतर सर्व कामे माॅन्सूनपूर्व पूर्ण करावीत, अशा सूचना नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिल्या.

रस्ते विकास प्रकल्पांतर्गत माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रयत्नातून १०७ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. यामध्ये शहरातील बहुतांशी कामे पूर्ण झाली असून काही कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. महात्मा गांधी पुतळा ते जिल्हा न्यायालय हा मुख्य रस्ता तसेच फडणीस हौद, नाट्यगृह ते वेदभवन या रस्त्यांचे काम अद्याप झालेले नाही. या कामांची पाहणी स्वामी, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, नगर अभियंता संजय बागडे, उपनगर अभियंता राजेंद्र गवळी यांनी केली.

फोटो ओळी

०४०६२०२१-आयसीएच-०३

पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याची प्रलंबित कामे पाहणी करून ती पूर्ण करण्याच्या सूचना नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी दिल्या. या वेळी मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल उपस्थित होते.

Web Title: Road works in Ichalkaranji should be done before monsoon