रंकाळा टॉवर येथील रस्ता १५ दिवसांनी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 02:59 PM2020-06-23T14:59:26+5:302020-06-23T15:00:46+5:30

रंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर येथील रस्ता अखेर १५ दिवसांनी खुला झाला. येथील डॉक्टरला कोरोना झाल्यामुळे रस्ता बंद करण्यात आला होता. पर्यायी मार्गाने येथील वाहतूक सुरु होती. कोल्हापूर, गगनबावडा हा मुख्य मार्ग असल्यामुळे पर्यायी मार्गावर वाहतुकीची कोंडी होती.

The road at Rankala Tower is open after 15 days | रंकाळा टॉवर येथील रस्ता १५ दिवसांनी खुला

रंकाळा टॉवर येथील रस्ता १५ दिवसांनी खुला

googlenewsNext
ठळक मुद्देरंकाळा टॉवर येथील रस्ता १५ दिवसांनी खुलापर्यायी मार्गावर वाहतुकीची होत होती कोंडी

 कोल्हापूर :रंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर येथील रस्ता अखेर १५ दिवसांनी खुला झाला. येथील डॉक्टरला कोरोना झाल्यामुळे रस्ता बंद करण्यात आला होता. पर्यायी मार्गाने येथील वाहतूक सुरु होती. कोल्हापूर, गगनबावडा हा मुख्य मार्ग असल्यामुळे पर्यायी मार्गावर वाहतुकीची कोंडी होती.

रंकाळा टॉवर परिसरातील प्रसिद्ध हॉस्पिटलमधील डॉक्टरला कोरोना झाल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे रंकाळा टॉवर ते रंकाळा रोड मुख्य मार्गासह परिसरातील गल्लीमध्ये जाणारा रस्ता बँरेकडस लावून बंद केला होता.

याचबरोबर पोलीस बंदोबस्तीही तैनात करण्यात आला होता. १५ दिवसांनी रस्ता खुला झाल्याने परिसरातील व्यावसायिक, नागरीकांसह वाहनधारकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. याचबरोबर परिसरातील राष्ट्रीयकृत बँकसह सुरु झाली आहे.

 

Web Title: The road at Rankala Tower is open after 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.