मांगेवाडीजवळ रस्ता खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST2021-06-20T04:17:20+5:302021-06-20T04:17:20+5:30
सरवडे : राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी ते नरतवडे फाटादरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेने थेट पाईपलाईन टाकली आहे. पाईप टाकल्यानंतर दुरुस्ती न केल्याने ...

मांगेवाडीजवळ रस्ता खचला
सरवडे : राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी ते नरतवडे फाटादरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेने थेट पाईपलाईन टाकली आहे. पाईप टाकल्यानंतर दुरुस्ती न केल्याने तीनशे मीटर रस्ता खचला आहे. रात्री उशिरा येथे पडलेल्या चरीत माल वाहतूक ट्रक अडकला. जेसीबीच्या साह्याने हा ट्रक बाहेर काढण्यात आला.
थेट पाईपलाईनचे नरतवडे फाटा ते मांगेवाडीपर्यंत मोठे पाईप टाकले आहेत. पाईप टाकताना तेथील माती काहींनी शेतीसाठी वापरली. त्यामुळे तेथे मजबूत भराव पडला नाही. महानगरपालिकेने यावर भराव करून दिला जाईल, असे सांगितले होते. दरम्यान, तसे सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगरपालिकेस कळविले होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा भराव खचून चर पडली. या मार्गावरून नेहमीच अवजड वाहतूक सुरू असते.
उशिरा दुसऱ्या वाहनाला बाजू देताना अवजड वाहतूक असलेला ट्रक चरीत अडकला. शेजारच्या नागरिकांनी व ग्रामस्थ यांनी संपर्क साधून जेसीबीद्वारे ट्रक बाहेर काढला. या रस्त्यावर होणारी रहदारी लक्षात घेऊन पालिकेने तीनशे मीटर असलेल्या रस्त्यावर मुरुम टाकून मजबुतीकरण करावे, अशी मागणी माजी सरपंच राजेंद्र मिस्त्री यांनी केले आहे.
फोटो १) मांगेवाडी ते नरतवडे मार्गावर रस्ता खचला. २) या पडलेल्या चरीत अडकलेला माल वाहतूक ट्रक जेसीबीच्या सहाय्याने काढला.