रस्ते खोदाईच्या नियोजनाचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:18 IST2021-06-04T04:18:57+5:302021-06-04T04:18:57+5:30
कळंबा : उपनगरात क्रशर चौक ते संभाजीनगर तसेच देवकर पाणंद ते साळोखेनगर या प्रमुख रस्त्यावर पाइपलाइन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात ...

रस्ते खोदाईच्या नियोजनाचा फज्जा
कळंबा : उपनगरात क्रशर चौक ते संभाजीनगर तसेच देवकर पाणंद ते साळोखेनगर या प्रमुख रस्त्यावर पाइपलाइन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. पाइपलाइन टाकल्यानंतर रस्ता दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. आजमितीला वाहनधारकांना रस्त्यावरून वाहन चालवण्यासाठी कसरत करावी लागत असून पावसाळ्यात कसे होणार, याची धास्ती सर्वसामान्य नागरिकांना लागून राहिली आहे.
उपनगरात समाविष्ट विविध प्रभागात ड्रेनेज पिण्याच्या पाण्याची जलवाहिन्या टाकणे आदी कारणास्तव रस्त्यांची खोदाई करण्यात आली असून काम पूर्ण होताच उकरण्यात आलेल्या रस्त्यावरील खडी मुरूमाने पुन्हा रस्ते बुजवण्यात आलेले आहेत. वास्तविक खोदकाम केलेला रस्ता पुन्हा दर्जेदार करून घेण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असूनही संबंधित ठेकेदारावर पालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधीचा अंकुश नसल्याने सारे फावले आहे.
चांगले डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते खोदून पुन्हा निव्वळ मुरूमात मुजवल्याने पावसाळ्यात यामध्ये पाणी जाऊन अपघातात वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. वास्तविक १५ मेनंतर रस्ता खुदाई व डांबरीकरण कामे हाती घेता येत नाहीत. यामुळे पावसाळ्यापूर्वी खुदाई करण्यात आलेल्या रस्त्याना डांबर लागणार नाही हे निश्चित असल्याने नागरिक धास्तावले आहेत.
चौकट -पाच वर्षे निव्वळ मुरूमच
देवकर पाणंद ते क्रशेर चौकादरम्यान दोन ठिकाणी मोठे जीवघेणे खड्डे पडले असून पाच वर्षांत निव्वळ मुरूमच टाकून त्यांना बुजवण्यात धन्यता मानली गेली
कायमस्वरूपी डांबराने बुजवण्यात आलेच नाहीत. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साठल्याने वाहनधारकांना अंदाज न आल्याने कित्येकजण जायबंदी झाले तरी प्रशासन सुस्तच