शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

करवीर पश्चिम भागात रस्त्यांची दुरवस्था

By admin | Updated: January 23, 2015 00:47 IST

पंतप्रधान सडक योजना थंडावली : निधीअभावी डांबरीकरण, रुंदीकरण नाही

सावरवाडी : केंद्र शासनाच्या शासकीय निधीचा अभाव, रस्त्यांच्या दुरुस्तीकडे खासदारांचे झालेले दुर्लक्ष, पंतप्रधान सडक योजनांचे थंडावलेले काम, दळणवळणाच्या साधनांचा अभाव, डांबरीकरण व खडीकरणांची ठप्प झालेली कामे, या साऱ्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक गावांना जोडणाऱ्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यांची मोठी दुरवस्था निर्माण झाली.रस्त्यांमध्ये प्रचंड स्वरूपाचे खड्डे पडल्याने ग्रामीण वाहतूक ठप्प होऊ लागली आहे. रस्ते दुरुस्तीची कामेही थंडावली आहेत. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था सध्या बिकट झाली आहे. ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’, अशी अवस्था आहे. ग्रामीण भागात साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची ऊस वाहतूक जोरदार सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या मोरीची बांधकामेही रेंगाळलेल्या अवस्थेत आहेत. नागमोडी वळणे आहेत, तेथे सूचना फलक नाहीत. साईडपट्ट्यांचे कामही थांबले आहे.करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात उत्तर व दक्षिण दिशेला वाहतुकीसाठी मोठ्या रस्त्यांचे प्रकल्पही शासनदरबारी धूळ खात पडले आहेत. शासकीय निधीअभावी मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण व रुंदीकरण झालेले नाही. रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने ग्रामीण वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यातच रस्त्यावर उसाचा पाला टाकण्याचे प्रकार ग्रामीण भागात घडत असून, त्यामुळे अपघातची दाट शक्यता आहे. केंद्र शासनाकडून करवीर तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी गावागावांतील ग्रामस्थांतून होत आहे.तालुक्यातील मुख्य वाहतुकीच्या रस्त्यांची अवस्था सध्या बिकट आहे. शासकीय निधी अल्प मिळत आहे. डोंगरी भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत आवाज उठविणार.- भिकाजी जाधव,-भाजप करवीर तालुका उपाध्यक्ष.