गुडाळ-राधानगरीदरम्यानच्या रस्त्यावर दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:22 IST2021-09-13T04:22:31+5:302021-09-13T04:22:31+5:30

दरम्यान, कोसळलेली दरड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जेसीबीच्या साहाय्याने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू ...

The road between Gudal and Radhanagari collapsed | गुडाळ-राधानगरीदरम्यानच्या रस्त्यावर दरड कोसळली

गुडाळ-राधानगरीदरम्यानच्या रस्त्यावर दरड कोसळली

दरम्यान, कोसळलेली दरड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जेसीबीच्या साहाय्याने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत; परंतु दरड हटविण्याचे कार्य सुरू असतानाच दरड कोसळण्याचेही प्रकार सुरू असल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनण्याची शक्यता आहे.

गुडाळ ते राधानगरी या दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी गुडाळवाडीपासून कुडुत्रीपर्यंतचा पाच किलोमीटर लांबीचा रस्ता हा भोगावती नदी काठाला समांतर आहे. गुडाळवाडीकडून प्रवास करता असताना उजव्या बाजूला वाहणारी भोगावती नदी, तर डाव्या बाजूला उंच डोंगर आहे. पावसाळ्यात सततच्या पावसामुळे या रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रकार सतत घडत असतात. राधानगरीला जाण्याचा जवळचा मार्ग म्हणूनही या रस्त्यावर सतत वाहतुकीची वर्दळ असते.

रविवारी सकाळी गुडाळेश्वर मंदिराच्या दक्षिणेस असणारी दरड रस्त्यावर कोसळली. सकाळची वेळ असल्याने वर्दळ कमी होती. ग्रामपंचायत कर्मचारी बळी मोहिते यांनी राधानगरी एसटी आगार व संबंधित विभाग यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमित पाटील याने तत्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर शाखा अभियंता ए. जी. भोपळे, ठेकेदार संजय पाटील, संभाजी चौगले यांच्या उपस्थितीत दरड हटविण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

सोबत फोटो

फोटो कॅप्शन -- गुडाळ-राधानगरीदरम्यानच्या मार्गावर गुडाळवाडीनजीक रस्त्यावर कोसळलेली दरड.

Web Title: The road between Gudal and Radhanagari collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.