आर.के. नगरात ४६ हजारांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST2021-07-30T04:25:49+5:302021-07-30T04:25:49+5:30
कोल्हापूर : आर. के. नगरात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ४६ हजारांची घरफोडी केली. चोरट्यांनी २० हजारांच्या रोकडसह ...

आर.के. नगरात ४६ हजारांची घरफोडी
कोल्हापूर : आर. के. नगरात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ४६ हजारांची घरफोडी केली. चोरट्यांनी २० हजारांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याबाबत आप्पासाहेब कल्लाप्पा मगदूम यांनी करवीर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आर. के. नगरातील व्यंकटेश पार्कामध्ये आप्पासाहेब मगदूम हे राहतात. बुधवारी ते बाहेर गेले होते. दरम्यान चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने तिजोरीतील २० हजारांची रोकड, अडीच ग्रॅमची सोन्याची अंगठी, एक ग्रॅमची लहान अंगठी, श्री गणपती मूर्तीची चांदीची आभूषणे चांदीचा नेकला, छत्री, उंदीर, मोदक, पान, जोडवी असा एकूण ४३ हजार किमतीचा ऐवज लंपास केला. याची तक्रार मगदूम यांनी पोलीस ठाण्यात दिली.