कोल्हापूर : ‘ऋतुरंग’ हा काव्यसंग्रह मानवी मूल्यांचे प्रतिबिंब आहे. जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या कविता त्यामध्ये आहेत, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी मंगळवारी केले.
येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी लिहिलेल्या ‘ऋतुरंग’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. असेंब्ली रोडवरील एका हॉटेलमधील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, तर विद्यापीठातील मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे, राजाराम महाविद्यालयातील इंग्रजी अधिविभागप्रमुख डॉ. रघुनाथ कडाकणे प्रमुख उपस्थित होते.
या कवितासंग्रहामध्ये डॉ. हिर्डेकर यांचे अनुभवविश्व उमटले आहे. विद्यापीठातून निवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी लिहिते झाले असून ते चांगले असल्याचे डॉ. शिर्के यांनी सांगितले. मूल्ये, न्यायासाठी डॉ. हिर्डेकर यांनी केलेला संघर्ष मी पाहिलेला आहे. ‘ऋतुरंग’ हा त्यांचे काव्यात्मक आत्मचरित्र आहे. त्यातून त्यांनी माणसाची खरी ओळख करून दिली असल्याचे डॉ. लवटे यांनी सांगितले. डॉ. हिर्डेकर यांच्या कवितेचा संवेदनस्वभाव हा संवेदनशील मनाचा विविध पातळ्यांवरील समाजसंवाद असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. ‘ऋतुरंग’मधील कविता समाजभान, समाजमन घडविणाऱ्या असल्याचे डॉ. कडाकणे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास डी. आर. माने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चौगुले, रत्नमाला हिर्डेकर, बाजीराव ढवळे, रंगराव हिर्डेकर आदी उपस्थित होते. डॉ आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले. भाग्यश्री पाटील-कासोटे यांनी आभार मानले.
चौकट
समाजमन घडावे
मी जे आयुष्य जगताना सोसले, अनुभवले आणि शेतकरी, श्रमिक, महिला, आदी घटकांचे जे दु:ख, हाल पाहिले. ते ‘ऋतुरंग’मध्ये मांडले. त्यातील कविता कष्टकरी, श्रमिकांसह समाजाच्या विविध प्रश्नांच्या आहेत. एक संवेदनशील समाजमन घडावे, हा काव्यसंग्रहाचा उद्देश असल्याचे डॉ. हिर्डेकर यांनी सांगितले.
फोटो (३००३२०२१-कोल-ऋतुरंग प्रकाशन ०१, ०२) : कोल्हापुरात मंगळवारी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या ‘ऋतुरंग’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याहस्ते झाले. यावेळी डावीकडून बी. एम. हिर्डेकर, रणधीर शिंदे, सुनीलकुमार लवटे, रघुनाथ कडाकणे, प्रवीण चौगुले, भाग्यश्री पाटील-कासोटे उपस्थित होत्या. (छाया : नसीर अत्तार)
===Photopath===
300321\30kol_2_30032021_5.jpg~300321\30kol_3_30032021_5.jpg
===Caption===
फोटो (३००३२०२१-कोल-ऋतुरंग प्रकाशन ०१, ०२) : कोल्हापुरात मंगळवारी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या ‘ऋतुरंग’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून बी. एम. हिर्डेकर, रणधीर शिंदे, सुनीलकुमार लवटे, रघुनाथ कडाकणे, प्रविण चौगुले, भाग्यश्री पाटील-कासोटे उपस्थित होत्या. (छाया : नसीर अत्तार)~फोटो (३००३२०२१-कोल-ऋतुरंग प्रकाशन ०१, ०२) : कोल्हापुरात मंगळवारी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या ‘ऋतुरंग’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून बी. एम. हिर्डेकर, रणधीर शिंदे, सुनीलकुमार लवटे, रघुनाथ कडाकणे, प्रविण चौगुले, भाग्यश्री पाटील-कासोटे उपस्थित होत्या. (छाया : नसीर अत्तार)