शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

VidhanSabha Election 2024: कोल्हापूर दक्षिणवर 'ऋतु'राज की महाडिकांचा 'अमल'; थेट दुरंगी लढत 

By पोपट केशव पवार | Updated: October 19, 2024 17:17 IST

पोपट पवार  कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेले आमदार सतेज पाटील व खासदार धनंजय महाडिक यांची राजकीय रणभूमी असणाऱ्या ...

पोपट पवार कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेले आमदार सतेज पाटील व खासदार धनंजय महाडिक यांची राजकीय रणभूमी असणाऱ्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात यावेळेसही काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील व भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक यांच्यातच थेट दुरंगी लढत होत आहे.  शहरी व ग्रामीण असा तोंडवळा असलेल्या या मतदारसंघातील राजकीय ईर्षा सर्वश्रुत आहे. येथील निकालाचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणावर पडतात. महाडिक व पाटील यांना  मानणाऱ्या मतदारांचे  येथे  ‘पॉकेट’ आहे. त्यामुळे पक्षापेक्षाही येथे गटाला महत्त्व दिले जाते.  येथील निवडणुकीसाठी दोन्ही गटाकडून राबविली जाणारी प्रचार यंत्रणा, मतदारसंघातील संवदेनशीलता,  खर्चाचे  ‘आकडे’ थक्क करणारे  आहेत. त्यामुळेच कोल्हापूर दक्षिणचे ‘रण’ लढणे भल्याभल्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे असे बोलले जाते.गेल्या सहा महिन्यांपासूनच पोस्टरबाजी व सोशल मीडियावरून आरोप-प्रत्यारोपाने येथील वातावरण तापत आहे. कोट्यवधीची विकासकामे, पाच वर्षांतील मोठा लोकसंपर्क व ‘सतेज पॉवर’च्या जोरावर ऋतुराज यांना पुन्हा विजयाची खात्री आहे, तर दक्षिणमधील रखडलेली विकासकामे, समस्या, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे घटलेले मताधिक्य व महाडिक गटाच्या ताकतीवर अमल महाडिकच आमदार होतील असा दावा केला जात  आहे.इतर इच्छुक कंदलगावचे वसंत पाटील, जवाहरनगरातील अरुण सोनवणे, उजळाईवाडीचे एस. राजू माने अशी इतरही इच्छुकांची नावे येथे समोर  येत आहेत. अद्याप त्यांचा पक्ष की अपक्ष हे जरी ठरले नसले तरी  दक्षिणचे रण लढणे सोपे नाही  याची कल्पना साऱ्यांनाच आहे.

मागील तीनही निवडणुकीत उलटफेर

  • २००९ साली सतेज पाटील यांनी 'हाय व्होल्टेज' लढतीत धनंजय महाडिक यांचा अवघ्या ५,७६७ मतांनी पराभव केला, तर २०१४ ला भाजपकडून धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू अमल महाडिक यांनी भेट सतेज पाटील यांना ८,५२८ मतांनी पराभवांचा धक्का दिला.
  • २०१९ ला सतेज पाटील यांनी आपले पुतणे ऋतुराज यांना मैदानात उतरवून तब्बल ४२ हजार ७०९ मतांना अमल यांना पराभूत करुन पराभवाचे उट्टे काढले. त्यामुळे आता चौथ्या लढतीत २-२ बरोबरी की ३-१ असे निर्विवाद वर्चस्व याची उत्सुकता आहे.

२०१९चा निकाल 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Ruturaj Patilऋतुराज पाटीलAmal Mahadikअमल महाडिकBJPभाजपाcongressकाँग्रेस