कुंभोजमध्ये दर्ग्यास शिडी चढविण्याचा विधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:29 IST2021-02-17T04:29:46+5:302021-02-17T04:29:46+5:30
मौलाना मेहबूब मुजावर यांनी फातेहा पठण केले. यानंतर शिडीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. उरूस व यात्रा कमिटीचे अध्यक्ष अरुण ...

कुंभोजमध्ये दर्ग्यास शिडी चढविण्याचा विधी
मौलाना मेहबूब मुजावर यांनी फातेहा पठण केले. यानंतर शिडीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. उरूस व यात्रा कमिटीचे अध्यक्ष अरुण पाटील, उपाध्यक्ष विजय नामे, सचिव राजेंद्र कुरणे, प्रकाश पाटील, सागर कांदेकर यांच्याहस्ते दर्गा समाधीवर पुष्पहार अर्पण करण्यात आले. मानकऱ्यांच्याहस्ते शिडीचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. हारूण मुजावर यांनी सलाम पठण केले.
वारणा दूध संघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अरुण पाटील यांचा, तसेच नूतन सरपंच माधुरी घोदे, उपसरपंच दाविद घाटगे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच माधुरी घोदे, विनायक पोतदार, विनोद शिंगे यांनी मनोगत व्यक्त केले. किरण माळी, रविराज जाधव, महेश पांडव, बाळासाहेब डोणे, सुभाष देवमोरे, सुरेश देवमोरे, सुरेश भगत, भारत जमणे, जहाँगीर हजरत, राजू मुजावर, शकिल मकानदार, बाबासाहेब कोले उपस्थित होते.