शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

‘उत्तर’साठी ऋतुराज यांचा जोर -: ‘राधानगरी’ काँग्रेसकडेच घेण्याची नेत्यांची एकमुखी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:22 IST

तौफिक मुल्लाणी यांनी ऋतुराज पाटील यांना उमेदवारी दिल्यास शंभर टक्के यशाची खात्री दिली.आपला स्वार्थ नाही, कोणालाही उमेदवारी दिली तरी ‘उत्तर’मधून कॉँग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नशील राहू.

ठळक मुद्दे विधानसभेसाठी मुलाखती

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून युवा नेते ऋतुराज संजय पाटील, माजी महापौर सागर चव्हाण, दौलत देसाई, आदींनी कॉँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली. पाटील, चव्हाण यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत या मतदारसंघात कॉँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा दावा केला. राधानगरीमधून अर्धा डझन इच्छुक असले तरी, हा मतदारसंघ कॉँग्रेसला घेऊन आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, अशी एकमुखी मागणी निरीक्षकांकडे केली.

कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्टÑाच्या प्रभारी सोनल पटेल, निरीक्षक अजय छाजेड, आनंदराव पाटील यांनी सोमवारी कॉँग्रेस कमिटीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. राधानगरीतून ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे, सत्यजित जाधव, हिंदुराव चौगले, उदयसिंह पाटील-कौलवकर, यशवंत हाप्पे, विजयसिंह मोरे इच्छुक आहेत. या सर्वांनी एकत्रित येत राधानगरी कॉँग्रेसकडे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी माजी आमदार दिनकरराव जाधव, कृष्णराव किरुळकर, ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे, आदी उपस्थित होते.

‘कोल्हापूर उत्तर’मधून संजय पाटील यांनी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे आंदोलक असल्याने त्यांना छेद देण्यासाठी आपल्यासारख्या आंदोलकाला संधी देण्याची मागणी केली. तौफिक मुल्लाणी यांनी ऋतुराज पाटील यांना उमेदवारी दिल्यास शंभर टक्के यशाची खात्री दिली. ‘मनपा’ पोटनिवडणुकीत विद्यमान आमदारांच्या वॉर्डात कॉँग्रेसचा उमेदवार विजयी करण्याची किमया आमदार सतेज पाटील यांनी केल्याचे सांगून ऋतुराज पाटील म्हणाले, शहरात महापालिकेच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात पक्ष वाढविण्याचे काम केले. शहरात अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी पक्षाने संधी द्यावी. आपला स्वार्थ नाही, कोणालाही उमेदवारी दिली तरी ‘उत्तर’मधून कॉँग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नशील राहू. सागर चव्हाण म्हणाले, चव्हाण कुटुंब कॉँग्रेसचे निष्ठावंत आहे. शहरातील कॉँग्रेस म्हणजे चव्हाण असेच समीकरण आहे. सतेज पाटील व पी. एन. पाटील यांनी जबाबदारी दिल्यास ताकदीने लढू. माजी उपमहापौर विक्रम जरग म्हणाले, १९६७ पासून चव्हाण कुटुंब महापालिकेच्या राजकारणातून शहराच्या विकासासाठी झटत आहे. झोपडपट्टी, शिंगणापूर पाणी योजना, थेट पाईपलाईनसह विविध विकासकामे चव्हाण पिता-पुत्रांच्या महापौर कालावधीतच मार्गी लागली.

‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, आतापर्यंत सहा वेळा शिरोळमधून उमेदवारी मागितली; पण धनदांडग्यांचा विचार झाला. यावेळी आपण आग्रही नाही. गणपतराव पाटील व आपणापैकी कोणालाही द्या. शाहूवाडीतून जिल्हा बॅँकेचे माजी संचालक अमर पाटील, राज्य बॅँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, ओकांर सुतार यांनी मागणी केली. शाहूवाडीतील राष्टÑवादी शिवसेनेसोबत आहे. आपण संधी दिली तर निश्चितच लढू. मित्रपक्षाला पाठिंबा द्यायचा म्हटला तरी हरकत नसल्याचे अमर पाटील यांनी सांगितले.

दक्षिणमधून आमदार सतेज पाटील यांची एकमुखी मागणी एकनाथ पाटील, उपमहापौर भूपाल शेटे, प्रदीप झांबरे यांनी केली. इचलकरंजीतून प्रकाश आवाडे व राहुल खंजिरे यांनी, तर हातकणंगलेतून राजू आवळे, किरण कांबळे, प्रशांत कांबळे, संगीता हंडोरे यांनी मागणी केली.

चव्हाण, हंडोरे, ऋतुराज, ‘पी. एन.’ यांचे शक्तिप्रदर्शनसागर चव्हाण, संगीता चंद्रकांत हंडोरे, ऋतुराज पाटील व पी. एन. पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने कॉँग्रेस कमिटी दणाणून गेली....अन्यथा कर्नाटकसारखी अवस्था

उमेदवारी देताना निष्ठावंतांना द्या.अन्यथा, कर्नाटकसारखी अवस्था होईल. महाराष्टÑातही फोडाफोडीचे राजकारण होऊ शकते, अशी भीती मुल्लाणी यांनी व्यक्त केली.

शंकररावांचे ‘खानविलकर’ प्रेमकरवीर तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील हे पी. एन. पाटील यांच्या समर्थनार्थ बोलताना, कोणत्याही परिस्थितीत २०१९ ला दिग्विजय खानविलकर आमदार असतील, असे बोलून गेले. यावर हरकत घेत, ‘बघा पी. एन. साहेब पहिले यांना तपासा’, असा चिमटा सतेज पाटील यांनी काढला.आवाडे समर्थकांची ‘हातकणंगले’तून मागणीप्रकाश आवाडे यांचे समर्थक जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती किरण कांबळे यांनी हातकणंगलेमधून मागणी केली.गेली अनेक वर्षे कॉँग्रेसकडून बौद्ध समाजाला उमेदवारी दिलेली नाही. येथे या समाजाची संख्या जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.

‘चंदगड’, ‘कागल’चे इच्छुक गैरहजरचंदगडमधून मागणी केलेले माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील हे दोनच दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेल्याने विद्याधर गुरबे हे एकमेव इच्छुक आहेत. तेही पावसामुळे मुलाखतीसाठी आले नाहीत.कागलमध्ये दत्ताजीराव घाटगे यांनीही पाठ फिरविली. करवीरमधून जिल्हा बॅँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे यांनी मागणी केली होती; पण त्याही मुलाखतीसाठी आल्या नाहीत.

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर