ऋतिका हेरवाडे काव्यवाचन स्पर्धेत तिसरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:03 IST2021-02-05T07:03:03+5:302021-02-05T07:03:03+5:30
२९०१२२०१-आयसीएच-०१- ऋतिका हेरवाडे इचलकरंजी : येथील कन्या महाविद्यालयामधील मराठी विभागातील बी. ए. भाग ३ ची विद्यार्थिनी ऋतिका बाबासाहेब हेरवाडे ...

ऋतिका हेरवाडे काव्यवाचन स्पर्धेत तिसरी
२९०१२२०१-आयसीएच-०१- ऋतिका हेरवाडे
इचलकरंजी : येथील कन्या महाविद्यालयामधील मराठी विभागातील बी. ए. भाग ३ ची विद्यार्थिनी ऋतिका बाबासाहेब हेरवाडे हिने राष्ट्रीय काव्यवाचन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. ही स्पर्धा शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ व डी. आर. माने कॉलेज, कागल यांनी आयोजित केली होती. ऋतिका हिने 'लेक वाचवा' ही कविता सादर केली होती.
साहित्यकृती पुरस्कार सोहळा जुलैमध्ये
इचलकरंजी : आपटे वाचन मंदिराचा जानेवारी ते डिसेंबर २०१९ मधील साहित्यकृती पुरस्कार सोहळा जुलैमध्ये होणार असल्याचे ग्रंथालयाच्यावतीने सांगण्यात आले. जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधित प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींचा पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे त्यासाठी पुस्तके पाठविण्यात येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.