शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा नदीने गाठली धोकापातळी, ‘राधानगरी’चे बंद झालेले दोन दरवाजे पुन्हा उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 17:18 IST

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारीही पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी धरणक्षेत्रातील पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडून धोका पातळी गाठली आहे. जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली आहेत. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४३ फूट इतकी झाली आहे. राधानगरी धरणाचे बंद झालेले दोन दरवाजे पुन्हा उघडले असून त्यातून ७११२ क्युसेक्स जलविसर्ग सुरु आहे.

ठळक मुद्देपंचगंगा नदीने गाठली धोकापातळी, ‘राधानगरी’चे बंद झालेले दोन दरवाजे पुन्हा उघडलेपूरस्थिती कायम; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारीही पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी धरणक्षेत्रातील पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडून धोका पातळी गाठली आहे. जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली आहेत. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४३ फूट इतकी झाली आहे. राधानगरी धरणाचे बंद झालेले दोन दरवाजे पुन्हा उघडले असून त्यातून ७११२ क्युसेक्स जलविसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी सायंकाळी ५ वाजता ४३.२ इतकी वाढली असून चंदगड तालुक्यातील हेरे येथील लघुपाटबंधारे तलाव सायंकाळी पाच वाजेपर्र्यत पूर्ण संचयपातळीपर्यंत भरला आहे.

राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४३ फूट

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम असून, दुपारनंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शहरातलगतच्या पूरग्रस्त गावांना भेट देऊन पाहणी केली. राधानगरी धरणाचे चारपैकी दोन दरवाजे बंद झाले होते, मात्र ३ आणि ६ क्रमांकाचे दरवाजे पुन्हा उघडले असून, चारही दरवाजांमधून ७११२ क्युसेक जलविसर्ग सुरू आहे. दरम्यान, चंदगड तालुक्यातील तिलारी घाटात दरड कोसळली आहे, घटनास्थळी दुचाकीसह अडकलेल्या काही पत्रकारांची स्थानिक नागरिकांनी सुटका केली आहे.

तिलारी घाटात दरड कोसळली जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १२५.५० मि.मी. इतका पाऊस पडला आहे. शिरोळ तालुक्यात सर्वांत कमी १५ मि.मी. पाऊस झाला आहे; तर राधानगरीसह वारणा, दूधगंगा, कासारी, पाटगाव अशा धरणक्षेत्रांत सरासरी ४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बुधवार आणि गुरुवारच्या तुलनेत पाऊस कमी असला तरी जलविसर्गामुळे व धरणक्षेत्रातील पावसाने पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली. सकाळी ११ वाजता पंचगंगेची पाणीपातळी ४३ फुटांवर पोहोचल्याने पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे.

रुई येथील गणपती मंदीराला पाण्याने वेढले

हातकणंगले तालुक्यात आज २३ मिमी (एकुण ४५७.७९), शिरोळमध्ये १५ मिमि (३४२), पन्हाळ्यात ६९.५७ (११५७.७१), शाहूवाडीत ७३.१७ (१५६२.२३), राधानगरीत ७९.६७ (१४८0.५0), गगनबावड्यात १२५.५0 (३३५६.५0), करवीरमध्ये ६0.१८ (९३६.२७), कागलमध्ये ५६.१४ (९0६.७१), गडहिंग्लजमध्ये २५.४३ (६00.७१), भुदरगडमध्ये ५७.४0 (११७९.६0), आजºयात ५४.५0 (१४७0.७५) तर चंदगडमध्ये ७३.१७ मिमि (एकुण १४५२.१७) इतका पाऊस पडला आहे.

भोगावती नदीचे पाणी बालिंगा पुलाशेजारी रस्त्यावर आल्याने तसेच लोंघे व मांडुकली येथे रस्त्यांवर पाणी आल्याने कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग अजूनही वाहतुकीसाठी बंद आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महार्गावरही केर्ले, आंबेवाडी या ठिकाणी पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकीसाठी शिवाजी पूल येथून बंद असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पवार पाणंद येथेही पाणी आल्याने कोल्हापूरहून वडणगेकडे जाणारा मार्गही बंद करण्यात आला आहे. प्रयाग चिखली येथील संगमस्थळी असलेल्या पुलावरही पुराचे पाणी आल्याने तो वाहतुकीसाठी बंद आहे.

रुई येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यावर पाणी आले आहे. उजवी बाजुकडील गणपती मंदीराला या पाण्याने वेढले आहे. हळदी येथे पुराचे पाणी आल्यामुळे कोल्हापूर ते राधानगरी रस्ता हळदी येथे बंद करण्यात आला आहे. चित्री प्रकल्प दुपारी तीन वाजता ओव्हरफ्लो झाला असून ६५0 क्येसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने ७९ बंधारे पाण्याखाली गेल्याने जिल्ह्याची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ९ मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे. कासारी नदीवरील- बाजारभोगाव, वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, यवलूज, कांटे, करंजफेन व पेंडाखळे. तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड व बाचणी. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे व मांडूकली. वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरुपली, बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेणगाव व चिखली. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, गिजवणे व निलजी. घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. ताम्रपणी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी. शाळी नदीवरील- येळावणे, कोळगाव व टेकोली. धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे व गवसी असे एकूण ७९ बंधारे पाण्याखाली आहेत.

आवश्यकतेनुसार नदीकाठच्या संभाव्य पूरग्रस्त नागरिकांच्या स्थलांतरासाठी तलाठी व स्थानिक यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. विशेषत: करवीर, कसबा बावडा, इचलकरंजी, कुरुंडवाड व इतर नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आले आहे. हातकणंगले येथे पूराचे पाणी आल्यामुळे येथील काही कुटूंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे.वाहून जाणाऱ्यांना वाचवलेजिल्हा नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार पाच तरुण पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते, त्यातील तीनजण वाहून गेल्याचे समजले आहे. कोल्हापूर शहरातील विजय घोडस, कैलास मोरे, महेश कदम, पप्पू ढेरे, पप्पू पायमल यांनी शिवाजी पुलावरून पुराच्या पाण्यात पोहण्याकरीता व स्टंट मारण्यासाठी नदीत उडी मारली होती. यापैकी दोघेजण पोहत बाहेर आले, मात्र तिघेजण वाहात गेले, सुदैवाने त्यांना झाडाचा आधार मिळाल्याने ते झाडावर चढुन बसले, त्यांना स्थानिक नागरिक व प्रत्यक्ष ही घटना पाहणाऱ्यांनी बाहेर काढले आहे.जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शहरालगतच्या शिवाजी पुलासह प्रयाग चिखली, केर्ली, आंबेवाडी, आदी पुराचे पाणी आलेल्या गावांना भेट देऊन पाहणी केली. बंद करण्यात आलेल्या मार्गांवरून कोणाला सोडू नका, अशा सूचना संबंधित यंत्रणेला त्यांनी दिल्या. यावेळी करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन गिरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, आदी उपस्थित होेते.राधानगरीचे दोन दरवाजे पुन्हा उघडलेराधानगरी धरणक्षेत्रात सातत्याने होणाऱ्या पावसामुळे गुरुवारी रात्री १0 वाजता स्वयंचलित दरवाजा क्रमांक ३ आणि रात्री ११.४५ वाजता दरवाजा क्रमांक ६ बंद झाला होता मात्र सकाळी हे दोन्ही दरवाजे पुन्हा उघडले. त्यामुळे या दोन्ही दरवाजांसह ४ आणि ५ क्रमांकाच्या दरवाजातूनही ७११२ क्युसेक जलविसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली आहे.पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यांजवळील पाण्याची पातळी आज सकाळी १0 वाजता ४२ फूट ८ इंच इतकी होती. नंतर या पाण्याने ४३ फूटाची धोकादायक पातळी गाठली आहे. राधानगरी धरणात आज अखेर ८.२९ टीएमसी पाणीसाठा आहे. कोदे लघुप्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. नजिकच्या कोयना धरणात ७८.७९ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात १0५.८७ इतका पाणीसाठा आहे.जिल्ह्यातील तुळशी २.७७, वारणा ३0.0८, दूधगंगा १६.७९, कासारी २.४0, कडवी २.५२, कुंभी २.३७, पाटगाव ३.0९, चिकोत्रा १.0३, चित्री १.७१, जंगमहट्टी १.२२, घटप्रभा १.५६, जांबरे धरणात 0.८२ तर कोदे लघु पाटबंधाºयात 0.२१४ टीएमसी पाणीसाठी आहे. राजाराम बंधाऱ्यात ४३, सुर्वे येथे ३९ , रुई येथे ६९.६ फूट, इचलकरंजी येथे ६५, तेरवाड येथे ५६.६, शिरोळ येथे ५८, नृसिंहवाडी येथे ५८, राजापूरात ४५ तर नजीकच्या सांगलीत ३४.६ आणि अंकलीत ३९.४ फूट पाणीसाठा आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर