शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कडाडलेले भाजीपाल्याचे दर आवाक्यात: वाहतूक सुरू झाल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 11:47 IST

Market Kolhpaur Flood: महापूर आणि बंद असलेल्या वाहतूक मार्गाचा गैरफायदा घेत भाजीपाल्याच्या केलेल्या कृत्रिम दरवाढीचा फुगवटा मंगळवारी वाहतूक सुरू झाल्यानंतर संपुष्टात आला आणि चार दिवसांपासून कडाडलेल्या भाजीपाल्याचे दर मागील आठवड्यासारखे पूर्ववत झाले. डाळी, कडधान्याचीही आवक सुरू झाल्याने दरही स्थिर आहेत. दरम्यान, भाजीपाल्याचे आगर असलेल्या शिरोळ, करवीर तालुक्यातून महापुरामुळे आवक कमी झाल्याने कर्नाटकातील भाजीपाल्यावर कोल्हापूरकरांची भूक भागत आहे.

ठळक मुद्देभाजीपाल्याच्या कृत्रिम दरवाढीचा फुगवटा संपला कर्नाटकच्या भाजीपाल्यावर भागतेय कोल्हापुरकरांची भूक

कोल्हापूर : महापूर आणि बंद असलेल्या वाहतूक मार्गाचा गैरफायदा घेत भाजीपाल्याच्या केलेल्या कृत्रिम दरवाढीचा फुगवटा मंगळवारी वाहतूक सुरू झाल्यानंतर संपुष्टात आला आणि चार दिवसांपासून कडाडलेल्या भाजीपाल्याचे दर मागील आठवड्यासारखे पूर्ववत झाले. डाळी, कडधान्याचीही आवक सुरू झाल्याने दरही स्थिर आहेत. दरम्यान, भाजीपाल्याचे आगर असलेल्या शिरोळ, करवीर तालुक्यातून महापुरामुळे आवक कमी झाल्याने कर्नाटकातील भाजीपाल्यावर कोल्हापूरकरांची भूक भागत आहे.आपत्तीतही लाभ उठवण्याची प्रवृत्ती यावेळच्या महापुरातही दिसली. महापुरामुळे भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाल्याने लगेच दरात चारपटीने वाढ झाली. त्यामुळे शनिवार आणि रविवारी कोल्हापूर शहरात कोथिंबिरीची एक पेंडी शंभर रुपयांवर, मिरची शंभर रुपयांवर, तर वांगी दोनशे रुपये किलोवर गेली होती. टोमॅटोही १५० रुपये किलो दराने विकले जात होते. पण सुदैवाने सोमवारी पावसाने पूर्णपणे उघडीप दिली.

महापुराचे पाणीही ओसरू लागल्याने प्रमुख मार्गही वाहतुकीसाठी खुले होऊ लागले. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग शंभर टक्के खुला झाल्याने चार दिवसांपासून अडकलेली सर्व वाहने मार्गस्थ झाली. परिणामी शहरासह जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांत भाजीपाल्याचा पुरवठा वाढला. आवक वाढल्याने भाजीपाल्याच्या कृत्रिम दरवाढीचा फुगवटा कमी झाला असून, दर मागील आठवड्याप्रमाणे पूर्ववत झाले. त्यामुळे बाजारात ग्राहकांकडून मनसोक्त खरेदी झाली. दिवसभर बाजारात भाजीच्या खरेदीसाठी गर्दी कायम होती.वांग्यांना चढला भावसर्व भाजीपाल्याचे अचानक वाढलेले दर कमी झाले असताना, वांग्यांनी मात्र चांगलाच भाव खाल्ला आहे. ३० ते ४० रुपयांना पावकिलो असा वांग्याचा दर आहे. भरताचे वांगेदेखील २० रुपयांना एक असे विकले जात आहे. पांढरी वांगी किलोला सव्वाशे ते दीडशेवर गेल्याने काळ्या वांग्यांना मागणी वाढली आहे, पण त्याचेही दर १०० रुपयांच्या घरातच असल्याने वांगी सर्वसामान्यांच्या परवडण्याच्या पलीकडे गेली आहेत.प्रमुख भाजीपाल्याचे दर असे (किलोमध्ये)

  • वांगी १२० ते १४०
  • टोमॅटो २५ ते ३०
  • भेंडी ७० ते ८०
  • ढबू ४० ते ५०
  • घेवडा ८० ते १००
  • बिन्स १२०
  • वरणा ७० त ८०
  • कांदा १५ ते २५
  • बटाटा २० ते २५
  • पेंडीचे दर असे
  • मेथी १० ते १५
  • शेपू १०
  • पोकळा १०
  • कांदापात १० ते १५
  • शेवगा १० ते २०
  • कोथिंबीर २० ते २५ 

डाळी कडधान्ये (किलोमध्ये)

  • तूरडाळ: १००
  • मूगडाळ: १२०
  • उडीद डाळ: १२०
  • चवळी: ९०
  • हिरवा मूग: १००
  • हिरवा वाटाणा: ९०
  • मटकी: १२०
  • मसुरा ९०
  • मसूर डाळ ९०
  • हरभरा डाळ ७८
  • ज्वारी ३० ते ५८
  • गहू ३० ते ३५
  • बाजरी ३०
  • नाचणा ४०

 

टॅग्स :MarketबाजारKolhapur Floodकोल्हापूर पूर