शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
6
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
7
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
8
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
9
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
10
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
11
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
12
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
13
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
14
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
15
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
16
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
17
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
18
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
19
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
20
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरीत्या वाहन हाकणाऱ्यांना ‘आरटीओ’चा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 17:08 IST

हेल्मेट न घालता वाहन चालविणे, मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे, दुचाकीवरून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून जाणे अशा एक ना अनेक प्रकरणांत प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)ने गेल्या तीन महिन्यांत कारवाईचा बडगा दाखवीत परवाने निलंबित करण्यासह सुमारे ६४ लाखांचा दंड वसूल केला.

ठळक मुद्देअवैधरीत्या वाहन हाकणाऱ्यांना ‘आरटीओ’चा दणकातीन महिन्यांच्या कारवाईत ६४ लाखांचा दंड वसूल

कोल्हापूर : हेल्मेट न घालता वाहन चालविणे, मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे, दुचाकीवरून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून जाणे अशा एक ना अनेक प्रकरणांत प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)ने गेल्या तीन महिन्यांत कारवाईचा बडगा दाखवीत परवाने निलंबित करण्यासह सुमारे ६४ लाखांचा दंड वसूल केला.गेल्या तीन महिन्यांत वाहतूक सुरक्षा मोहिमेअंर्तगत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शहरासह जिल्हाभरात अवैधरीत्या वाहन चालविणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यात कार्यालयाने जिल्हाभरात नेमलेल्या भरारी पथकाद्वारे हेल्मेट न वापरणे, रिफ्लेक्टिव्ह टेप न लावणे, मोबाईलवर बोलत वाहने चालविणे , क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून वाहने हाकणे, चारचाकी गाड्यांना अवैधरीत्या फिल्मिंग करणे, वाहन चालविण्याचा परवाना न बाळगणे, सादर न करणे, गाडीची कागदपत्रे, इन्शुरन्स नसणे, आदी प्रकारच्या अवैध वाहतुकीला चाप व शिस्त लावण्यासाठी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातून सुमारे ६४ लाख ९ हजार २२९ इतका महसूल दंडरूपाने मिळवला आहे.

 

प्रत्येकाने वाहतुकीचे नियम, गाडीची कागदपत्रे, इन्श्युरन्स, योग्य प्रकारचा वाहन क्रमांक, आदी बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. जे तपासणीदरम्यान दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.- अजित शिंदे,प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर

तीन महिन्यांत केलेली कारवाई अशी (कंसात प्रकरणे)हेल्मेट न बाळगणे - ११६ ,रिफ्लेक्टिव्ह टेप न लावणे- ३००, दोषी वाहने (५०), मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे ( १३०) , दुचाकीवरून क्षमतेपेक्षा अधिकजण बसून प्रवास करणे ( ५१), फिल्मिंग ( ८५), क्रमांक योग्य व नसलेली वाहने ( २२४), वाहन चालविण्याचा परवाना नसणे, सादर न करणे ( ९९१) अशा प्रकरणांत दोषी वाहनचालकांवर कारवाई करीत ६४ लाख ९ हजार २२९ रुपयांचा दंड आकारण्यात आला. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर