शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भीती घालून मागितली २० लाखांची खंडणी, माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीसह दोघांना १५ लाख घेताना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:03 IST

दोन वर्षांत चार हजार अर्ज

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) बनावट कागदपत्रांच्या आधारे औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी तक्रारी करण्याची भीती घालून २० लाखांची खंडणी मागणाऱ्या आणि तडजोडीअंती १५ लाख स्वीकारणाऱ्या माहिती अधिकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षासह दोघांना पोलिसांनी अटक केली.जयराज भीमराव कोळी (वय ४२, कोल्हापूर) आणि मध्यस्थ युवराज मारुती खराडे (४८, उचगाव), अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. २३) रात्री उशिरा कागल पंचतारांकित एमआयडीसीत सापळा रचून कारवाई केली.अजिंक्य पाटील हा शासकीय रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे आणि औषधांचा पुरवठा करतो. बनावट कागदपत्रांच्या आधारे काही औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याची पत्नी डॉक्टर असून, त्या सीपीआरमध्ये कार्यरत होत्या. माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळी हा या दाम्पत्याबद्दल वारंवार तक्रारी करीत होता. त्याने माहिती अधिकारात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अर्ज केले होते.असे अर्ज न करण्यासाठी त्याने मध्यस्थ युवराज खराडे याच्यामार्फत अजिंक्य पाटील याच्याकडे २० लाखांच्या खंडणीची मागणी केली. तडजोडीअंती १५ लाख रुपये देण्याचे ठरले. खंडणी देण्यापूर्वी पाटील याने पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्याकडे तक्रार केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कोळी आणि खराडे या दोघांना पैसे स्वीकारताना अटक केली. खंडणीसाठी दिलेले ३० हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेली कार आणि तीन मोबाइल असा ५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

दोन वर्षांत चार हजार अर्जकोळी याने गेल्या दोन वर्षांत विविध शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकारात तब्बल चार हजार अर्ज केले आहेत. अनेक अधिकाऱ्यांना त्याने अर्ज करून हैराण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.